शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

शेतीच्या नुकसानीचा खासदारांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:38 IST

अवकाळीचा फटका; कर्जतमध्ये ३,९२४ हेक्टर शेतीचे नुकसान

कर्जत : अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला. शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कर्जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे कर्जत तहसील कार्यालयात पोहोचले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, विधानसभा संघटक संतोष भोईर, रोहिदास मोरे, दशरथ भगत, मोहन ओसवाल, संतोष पाटील, सुरेश बोराडे, शिवराम बदे आदी उपस्थित होते. शासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, महसूल नायब तहसीलदार संजय भालेराव उपस्थित होते.तालुक्यात १८६ गावे आहेत, १८,०५२ हेक्टर शेतजमीन आहे, त्यापैकी पेरणी झालेले क्षेत्र ८,९९० हेक्टर होते. अवकाळी पावसामुळे कापणी करून ठेवलेले भात भिजले आणि खराब झाले. शेतात पाणी साचल्याने सपूर्ण पीक खराब झाले तर काहींवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला.जुलै व आॅगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ३,३३२ शेतकऱ्यांचे ९८२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये १०,०४६ शेतकºयांचे २,९४२ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. तालुक्यात एकूण १३ हजार ३७८ शेतकºयांचे ३,९२४ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.तलाठी, पंचायत समिती कार्यालयातील ग्रामसेवक आणि तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहायक तीनही कार्यालयाने एकत्रित पंचनामे केले आहेत. सर्व पंचनामे पूर्ण झाले असून याबाबतची माहिती शासनाला कळवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.खासदार श्रीरंग बारणे यांनी, बाधित शेतकºयांना मदत मिळालीच पाहिजे, क्षेत्राची मर्यादा न ठेवता सरसकट नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, असे सांगितले. सर्व शेतकºयांनी पीक विमा काढला पाहिजे, यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी जनजागृती अभियान राबवावे, अशा सूचना केल्या.कर्जत तालुका आदिवासी बहूल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात अनेक आदिवासी बांधव वनविभाग किंवा शासकीय जागेत नाचणी, वरीचे पीक घेतात. त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अशा व्यक्तींना विशेष बाब म्हणून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.