शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक - बिरवाडीत शीघ्र कृती दलाच्या तुकडीने केले संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 02:01 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.निवडणूक कालावधीत मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता पोलीस यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात असून याचाच एक भाग म्हणून पोलीस दलाच्या शीघ्र कृती दलाच्या जवानांनी बिरवाडी कुंभारवाडा किनारा ते बिरवाडी बाजारपेठमार्गे बिरवाडी पोलीस चौकीपर्यंत शनिवारी संचलन केले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे, प्रभारी अधिकारी पंकज गिरी उपस्थित होते.ग्रामपंचायतीमध्ये ६ वॉर्डमध्ये १७ जागांकरिता ४१ उमेदवार रिंगणात उतरले असून ५,५७७ मतदार  मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, या राजकीय पक्षांचे पुरस्कृत उमेदवार व अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार असून या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा दावा पोलीस यंत्रणेकडून करण्यात आला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तशा पद्धतीच्या नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्या आहेत.

राजकीय गणिते बदलण्याची शक्यताn महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप यांच्याकरिता बिरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असल्याने या निवडणुकीमध्ये गोगावले विरुद्ध जगतापांचा राजकीय संघर्ष प्रचारसभांच्या माध्यमातून पाहावयास मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. n ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत उमेदवार यांच्यामध्ये काटे की टक्कर होणार असली तरी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार व भाजप पुरस्कृत उमेदवारांमुळे प्रस्थापितांची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Raigadरायगड