शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी फिशिंगमुळे पारंपरिक मासेमारीला धोका , कोळी बांधवांचा बोडणी येथील सभेत आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 03:06 IST

केंद्र आणि राज्य सरकारने ‘एलईडी लाइट फिशिंग’वर कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा पारंपरिक मच्छीमारी करणारे कोळी बांधव अत्यंत उग्रआंदोलन पुकारतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा संतप्त इशारा उरण, अलिबाग, मुरुड, रेवस-बोडणी येथील कोळी बांधवांनी बोडणी येथे झालेल्या मच्छीमार सहकारी संस्था प्रतिनिधींच्या सभेत दिला आहे.

अलिबाग : केंद्र आणि राज्य सरकारने ‘एलईडी लाइट फिशिंग’वर कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा पारंपरिक मच्छीमारी करणारे कोळी बांधव अत्यंत उग्रआंदोलन पुकारतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा संतप्त इशारा उरण, अलिबाग, मुरुड, रेवस-बोडणी येथील कोळी बांधवांनी बोडणी येथे झालेल्या मच्छीमार सहकारी संस्था प्रतिनिधींच्या सभेत दिला आहे. या संदर्भातील निवेदने लवकरच जिल्हाधिकाºयांना देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.मोठ्या मच्छीमारी ट्रॉलर्सच्या माध्यमातून समुद्रात मच्छीमारी करताना आता, या ट्रॉलर्सवर बसविण्यात आलेल्या मोठ्या जनरेटरच्या माध्यमातून ट्रॉलर्सच्या पाण्यातील भागाला एलईडी लाइट लावण्यात आले आहेत. हे लाइट लावल्यावर समुद्रातील छोटी-मोठी मासळी या लाइटना आकर्षित होते आणि जाळ््यात मोठ्या प्रमाणात अडकतात; परंतु या एलईडी लाइट मच्छीमारी तंत्रामुळे उरण, अलिबाग, मुरुड, रेवस, बोडणी येथील समुद्रातील माशांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. परिणामी, या परिसरात मासळीचा दुष्काळ निर्माण होऊन पारंपरिक मच्छीमार बांधवांवर उपासमारीचीच पाळी आली असल्याची परिस्थिती मल्हारी मार्तंड मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने रेवस-बोडणी येथील साईबाबा मंदिराच्या पटांगणात आयोजित सभेत विशद करण्यात आली.सभेला रेवस-बोडणी मच्छीमार संस्थेचे चेअरमन विश्वास नाखवा, व्हाइस चेअरमन बाळनाथ कोळी, महाराष्टÑ मच्छीमार कृती समितीचे सेक्रेटरी उल्हास वाटकरे, जिल्हा कार्याध्यक्ष बी. एन. कोळी, शिवदास नाखवा (करंजा), खलाशी संघटना अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे, जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी, राजेंद्र कोळी, गैनी नाखवा (बोडणी), थळ मच्छीमार सोसायटीचे चेअरमन देवेश साखरकर, वरसोली सोसायटी चेअरमन धर्मा घाटकर, सासवणे मच्छीमार सोसायटीचे चेअरमन एकनाथ नाखवा, अलिबाग, मुरुड, उरण, रेवस, बोडणी येथील कोळी बांधव उपस्थित होते.दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बोटी नांगरल्याएलईडी लाइट फिशिंगमुळे पारंपरिक मासेमारी पूर्णपणे धोक्यात आली असून, रेवस-बोडणीच्या समुद्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने येथील कोळी बांधवांनी आपल्या बोटी बंदरात नांगरून ठेवल्या आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे, याची दखल शासनाने वेळीच घेऊन याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी या सभेत कोळी बांधवांकडून करण्यात आली.

टॅग्स :fishermanमच्छीमारRaigadरायगड