शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मर्क्सचा प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली, ९०० स्थानिक कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:18 IST

कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या गंभीर प्रकारानंतर (मर्क्स) बहुराष्ट्रीय कंपनीने उरण-पनवेल परिसरात सुरू असलेले तीनही प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

- मधुकर ठाकूरउरण  - कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या गंभीर प्रकारानंतर (मर्क्स) बहुराष्ट्रीय कंपनीने उरण-पनवेल परिसरात सुरू असलेले तीनही प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मर्क्सने प्रकल्प बंद केल्यास या ठिकाणी काम करणाºया सुमारे ९०० स्थानिक कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे.उरण-पनवेल येथील एपीएम (मर्क्स) कंपनीत काम करणाºया १४३ कामगारांना कंपनीने कामावरून कमी केले आहे. केंद्राने लागू केलेले डीपीडी धोरण आणि कामगार काम करीत नसल्याने तेच काम इतर कामगारांकडून जादा मोबदला मोजून कंपनीला करावे लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. डीपीडी धोरणामुळे थेट मालाची वाहतूक होत असल्याने काम कमी झाले आहे, त्यामुळे काम कमी झाल्याचे कारण देत एपीएमने (मर्क्स) उरण प्रकल्पातील ९९ आणि पनवेलमधील ४४ अशा एकूण १४३ कामगारांना कामावरून कमी केले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात संघर्ष सुरू आहे.कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी केंद्र, राज्य सरकारचे अनेक मंत्री, कामगार प्रतिनिधी यांच्या कंपनी अधिकाºयांशी भेटीगाठी आणि चर्चा झाल्या. मात्र, चर्चेनंतरही आश्वासनाशिवाय कामगारांच्या हाती काहीएक लागले नाही. त्यानंतर भाजपाचे महेश बालदी आणि सेनेचे राजिप सदस्य विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले. यात उरण येथे कंपनीच्या बसची तोडफोड करीत कर्मचारी आणि अधिकाºयांना मारहाण करण्यात आली. दुसºयांदा घडलेल्या या घटनेचा कंपनी व्यवस्थापनाने निषेध केला. इतक्यावर न थांबता बहुराष्ट्रीय एपीएम (मर्क्स) कंपनीने या घटनेची केंद्र सरकार, राज्य सरकार, दूतावास आणि मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली. चर्चेत कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेणे शक्य नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. त्याशिवाय कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने यापुढे दहशतीत कंपनीचे कामकाज चालविणे अवघड झाल्याचेही व्यवस्थापनाने निदर्शनास आणून दिले.कामगारांची दिशाभूलकंपनी व्यवस्थापनाने कामगारांबाबत भूमिका स्पष्ट केली असतानाही स्थानिक राजकीय पुढाºयांकडून कामगारांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना आंदोलन, मारहाण करण्यास उकसवण्यात येत आहे. वारंवार घडणाºया हल्ल्यांमुळे उरणमधील तीनही कंपन्या बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मर्क्सने तीनही प्रकल्प बंद केल्यास सुमारे ९०० स्थानिक कामगारांत कायमस्वरूपी बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड