नागोठणे : येथील रेल्वेस्थानकाच्या आवारातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह संबंधित चोरास पकडण्यात नागोठणे पोलिसांना यश आले असून अनिकेत बाबू चोरगे हा मोटारसायकल चोर सिद्धेश्वर, पाली येथील असल्याचे नागोठणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. सोहन जयवंत कुथे (रा. झोतीरपाडा, ता. पेण), मुंबईला जाण्यासाठी येथील रेल्वेस्थानकावर आले होते. त्यांनी आपली एमएच ०६ बीए ०००४ क्र मांकाची मोटारसायकल स्थानकाच्या आवारात उभी करून ते पहाटे साडेपाचच्या रोहा - दिवा गाडीने मुंबईकडे रवाना झाले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दादर- रत्नागिरी गाडीने ते पुन्हा परत आले असता, गाडी जागेवर न दिसल्याने परिसरात त्यांनी शोध घेतला, त्यांना गाडी आढळून आली नसल्याने गाडीची चोरी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदविल्यानंतर पोलिसांनी शोध जारी ठेवत मिळालेल्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक शेगडे यांच्यासह सहा. फौजदार मोरे, पो. नाईक विक्र म फडतरे, वाहन चालक दरेकर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून महामार्गावर सापळा रचून ठेवला असता, पेट्रोल पंपासमोर चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह आरोपी चोरगे याला ताब्यात घेतले. आरोपीला रोहा न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून त्याची रवानगी अलिबागच्या जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. (वार्ताहर)
मोटारसायकल चोर नागोठणे पोलिसांच्या ताब्यात
By admin | Updated: June 22, 2016 02:08 IST