शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सनियंत्रण समिती ई-रिक्षासाठी अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 04:06 IST

इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या माथेरान परिसरातील अमानवीय हातरिक्षांना आता लवकरच आळा बसणार आहे. माथेरान ई-रिक्षा परवानगी प्रकरणी सनियंत्रण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला

महेश चेमटेमुंबई : इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या माथेरान परिसरातील अमानवीय हातरिक्षांना आता लवकरच आळा बसणार आहे. माथेरान ई-रिक्षा परवानगी प्रकरणी सनियंत्रण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. अहवालात माथेरानमधील भौगोलिक स्थिती मांडण्यात आली असून, ई-रिक्षासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.सुमारे १०० वर्षांपासून अमानवी पद्धतीने हातरिक्षाचा माथेरानमध्ये वाहतुकीसाठी वापर होतो. प्रवासी वाहतुकीसह जीवनावश्यक वस्तंूच्या वाहतुकीसाठीही हातरिक्षाचा वापर करतात. परिणामी, या अमानवीय प्रथेपासून सुटका मिळावी म्हणून ई-रिक्षा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.त्यानुसार राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने केंद्र शासनास पाठविलेल्या प्रस्तावानुसार सनियंत्रण समिती पुनर्गठित करण्यात आली. संबंधित शाखेने २३ मार्च २०१७ रोजी रायगडचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून सनियंत्रण समितीचा अहवाल मागितला होता. समितीचा अहवाल नुकताच राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. अहवालात माथेरान ई-रिक्षा प्रकरणी अनुकूलता दर्शविण्यात आली आहे.परिवहन विभागाच्या पनवेल येथील अधिकाºयांनी माथेरान ई-रिक्षा प्रकरणी सकारात्मक अहवाल सरकारकडे सादर केला आहे. यात वाहनबंदी कायद्यात केंद्राने योग्य ते बदल केल्यानंतर राज्य शासनाकडून योग्य त्या परवानग्या घेत ई-रिक्षा सुरू करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्थापन केलेल्या सनियंत्रण समितीचा अभिप्राय घेण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याशी मार्च महिन्यात पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला असून, केंद्रातर्फे परवानगीसाठी केवळ औपचारिकता शिल्लक आहे. त्यामुळे पर्यावरण सचिव यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे लवकरात लवकर माथेरान ई-रिक्षा प्रकरणी अहवाल सादर करावा, अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.दूध, मिनरल वॉटर.... ५ रूपयेगॅस सिलिंडर........... १००- १५० रूपये