शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By admin | Updated: September 23, 2015 04:11 IST

ऐरोली-ठाणे येथील काही विद्यार्थीनींना पुण्यामध्ये क्रिडा स्पर्धांसाठी घेवून गेलेल्या प्रशिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत परतीच्या प्रवासादरम्यान द्रुतगती महामार्गावर असणाऱ्या हॉटेलमध्ये

खालापूर : ऐरोली-ठाणे येथील काही विद्यार्थीनींना पुण्यामध्ये क्रिडा स्पर्धांसाठी घेवून गेलेल्या प्रशिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत परतीच्या प्रवासादरम्यान द्रुतगती महामार्गावर असणाऱ्या हॉटेलमध्ये अल्पोपहारासाठी थांबल्यावर या विद्यार्थीनीबरोबर अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मद्याच्या अमलाखाली या प्रशिक्षकाला कसलेच भान राहिले नाही. या प्रकारामुळे भेदरलेल्या विद्यार्थ्यांनींनी घडलेला प्रकार घरी सांगितल्याने या मुलींच्या पालकांनी या प्रशिक्षकाविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्र ार दिली असून या प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ही घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्याने गुन्ह्याचा तपास खोपोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रशिक्षकास मंगळवारी (२२ सप्टेंबर) अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले.ही घटना रविवारी (२० सप्टेंबर) घडली. ऐरोली येथील सेंट झेवियर्स विद्यालयातील काही विद्यार्थीनी क्रीडा स्पर्धेसाठी पुणे येथे प्रशिक्षक विश्वास भादे याच्यासोबत गेल्या होत्या. या स्पर्धा उरकून या विद्यार्थीनी परतीचा प्रवास करत खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मॅकडोनाल्ड हॉटेल येथे अल्पोपहारासाठी त्यांची बस थांबली. यावेळी विश्वास भादेने मद्यधुंद अवस्थेत बसमधील विद्यार्थींनीबरोबर छेडछाड करण्यास सुरुवात केली. भेदरलेल्या विद्यार्थीनींनी हा सगळा प्रकार घरी पोहोचल्यानंतर आपल्या घरातील मंडळींना सांगितला. (वार्ताहर)