शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या नऊ कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:04 IST

पंचायत समिती सभापती सुप्रिया गोवारी यांना शिवीगाळ व धक्काबुकी प्रकरणातील आरोपी माजी सभापती प्रशांत शिंदे यांच्या पत्नी पूजा शिंदे यांनी शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यां

श्रीवर्धन : पंचायत समिती सभापती सुप्रिया गोवारी यांना शिवीगाळ व धक्काबुकी प्रकरणातील आरोपी माजी सभापती प्रशांत शिंदे यांच्या पत्नी पूजा शिंदे यांनी शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यां विरुद्ध श्रीवर्धन पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्र ार दाखल केली आहे.सुकुमार तोंडलेकर, जनार्दन गोवारी, नारायण गोलन, सागर करदेकर, मंगेश पोलेकर, बाबूराव चोरगे, प्रथमेश बारे, चॅलेंद्र पोलेकर, नंदकुमार भाटकर यांनी घरात घुसून प्रशांत शिंदे यांना जनार्दन गोवारी यांनी शिवीगाळ क रून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच वरील सर्वांनी प्रशांत शिंदे यांना मारहाण केली. या वेळी पूजा यांनी प्रशांत यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता जनार्दन गोवारी व सुकुमार तोंडलेकर यांनी धक्काबुक्की करून विनयभंग केला, तसेच मुलींना सुद्धा शिवीगाळ केली असल्याची तक्रार पूजा शिंदे यांनी के ली आहे.या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करत आहेत. श्रीवर्धनमधील राजकीय तणावामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने एसआरपी जवानांची टीम सज्ज करण्यात आली आहे.प्रशांत शिंदे यांना अटक व जामीनश्रीवर्धन पंचायत समिती सभापती सुप्रिया गोवारी यांना शिवीगाळ व धक्काबुकी केल्याप्रकरणी श्रीवर्धनमध्ये तणावाचे वातावरण असताना सायंकाळी उशिरापर्यंत संतप्त शिवसैनिकांचा जमाव श्रीवर्धन शिवाजी चौक परिसरात जमलेला होता.आरोपीला हजर करा असा आक्र ोश शिवसैनिक करत होते. मात्र, कालांतराने शिवसैनिक घरी गेल्यानंतर रात्री उशिराने माजी सभापती प्रशांत शिंदे यांना पोलिसांनी अटक केली व बुधवारी दुपारी श्रीवर्धन न्यायालयात हजर केले. न्यायालयात त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.श्रीवर्धनमधील तणावामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले असून, खोटे गुन्हे दाखल करणाºयांची योग्य चौकशी करून पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा.- बाबूराव चोरगे, उपसभापतीमाझी जामिनावर सुटका झाली आहे, तरीदेखील मी सांगतो, मी विद्यमान सभापतींना शिवीगाळ किंवा धक्काबुक्की केलेलीच नाही. त्या माझ्या मुलीप्रमाणे आहेत.- प्रशांत शिंदे,माजी सभापती