शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

एकादशीच्या कीर्तनातून आधुनिक लोकजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:08 IST

भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांना शिकवले

अलिबाग : भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांना शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते. अनेकदा कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्यात आली आहे. कीर्तनाची हीच परंपरा आधुनिक काळात आबाधित राखण्याकरिता अलिबागमध्ये कीर्तनकार अ‍ॅड. श्रीराम ठोसर, नवकीर्तनकार महेश्वर देशमुख आदीनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या सहयोगाने श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात ‘एकादशी कीर्तन’ परंपरेस प्रारंभ केला आहे.महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार आहे. येथे होणाऱ्या कीर्तनात ‘नारदीय कीर्तन’ आणि ‘वारकरी कीर्तन’ असे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हे भारतातील आद्य कीर्तनकार मानले जातात. ही नारदीय कीर्तन परंपरा एकादशी कीर्तनातून पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे महेश्वर देशमुख यांनी सांगितले.दरमहिन्यात दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतंत्र नाव आणि अस्तित्व आहे. त्यास अनुसरूनच ‘एकादशी कीर्तन’ परंपरेचा शुभारंभ ११ फेबु्रवारी रोजी विजया एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात सुप्रसिद्ध कीर्तनकार विजयबुवा सोमण यांच्या कीर्तनाने करण्यात आला. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी आमली एकादशीच्या दिवशी महिला कीर्तनकार उषा पटवर्धन यांचे कीर्तन झाले. या दोन कीर्तनकारांनंतर नवोदित कीर्तनकारांना या परंपरेत जाणीवपूर्वक आणण्याच्या हेतून सर्व एकादशींना नवोदित कीर्तनकारांची कीर्तने ठेवण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.पहिल्याच कीर्तनात ‘झिरो बजेट शेती’चा पर्याय११ व २६ फेब्रुवारीच्या प्रारंभाच्या दोन कीर्तनानंतर १३ मार्च रोजीच्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी देशमुख यांनी वयाच्या ६०व्या वर्षी कीर्तन कला अवगत करून घेऊन ‘झिरो बजेट शेती’ या विषयावरील पहिले कीर्तन सादर केले. त्यानंतर २७ मार्च रोजीच्या कामदायी एकादशीला नवकीर्तनकार संजय रावळे यांचे आधुनिक काळाशी श्रीकृष्णाचा संदर्भ सांगणारे कीर्तन, १२ एप्रिल रोजी वरोथिनी एकादशीच्या दिवशी काशिनाथ क्रमवंत यांचे आधुनिक काळाशी श्रीरामाचा संदर्भ सागणारे कीर्तन, तर २६ एप्रिल रोजी मोहिनी एकादशीच्या दिवशी गजानन दाते यांचे आधुनिक काळाशी श्री विठ्ठलाचा संदर्भ सागणारे कीर्तन झाले. येत्या ११ मे रोजीच्या अपरा एकादशीच्या दिवशी अलिबागमधील अ‍ॅड. कला पाटील यांनी आयुष्यातील पहिले कीर्तन श्री विठ्ठल मंदिरात भक्तसेवेत रुजू करणार आहेत.