शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

राजन साळवी यांची साडे पाच तास चौकशी; लाच लुचपत कार्यालयाच्या बाहेर येताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष

By राजेश भोस्तेकर | Updated: December 14, 2022 17:36 IST

राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना रायगड लाच लुचपत विभागाने मालमत्तेच्या उघड चौकशीला हजर राहून जबाब नोंदविण्याबाबत २ डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती.

अलिबाग : ठाकरे गटाचे राजापूर मतदार संघाचे आमदार राजन साळवी हे स्वतः च्या आणि कुटुंबाच्या मालमत्तेच्या उघड चौकशीसाठी बुधवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता अलिबाग येथे रायगड लाच लुचपत कार्यालयात हजर झाले होते. साडे पाच तास चौकशी केल्यानंतर आमदार राजन साळवी हे लाच लुचपत कार्यालयाच्या बाहेर आले. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष करून घोषणाबाजी केली. आमदार साळवी लाच लुचपत कार्यालयात चौकशी साठी येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिकाऱ्याच्या प्रश्नाला योग्य उत्तरे दिली असल्याचे आमदार राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 

राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना रायगड लाच लुचपत विभागाने मालमत्तेच्या उघड चौकशीला हजर राहून जबाब नोंदविण्याबाबत २ डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती. सोमवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालमत्तेची कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आमदार राजन साळवी हे ५ डिसेंबरला चौकशीला गैरहजर राहिले होते. पंधरा दिवसांनी हजर राहणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी लाच लुचपत विभागाला कळवले होते.

सोमवारी १२ डिसेंबर रोजी आमदार साळवी हे रायगड लाच लुचपत कार्यालयात येणार होते. मात्र घरातील सदस्याचा मृत्यू झाल्याने ते हजर राहिले नव्हते. बुधवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आमदार साळवी कार्यालयात दाखल झाले. लाच लुचपत विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सुषमा सोनवणे यांनी आमदार साळवी यांची चौकशी केली. आमदार राजन साळवी यांची साडे पाच तास चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याच्या स्वतः च्या, पत्नी, दोन मुले, भाऊ आणि त्याच्या कुटुंबाच्या मालमत्तेबाबत माहिती अधिकाऱ्यांनी घेतली असल्याचे आमदार राजन साळवी यांनी मध्यामशी बोलताना माहिती दिली. 

कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी

आमदार राजन साळवी हे लाच लुचपत कार्यालयात चौकशीला येणार असल्याने सकाळ पासून रायगडातील शिवसैनिक, पदाधिकारी यांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. साळवी याचे आगमन होताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. तर चौकशीनंतरही शिवसैनिकांनी साळवी यांना उचलून घोषणाबाजी केली. यावेळी आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी तसेच रायगडच्या शिवसैनिकांचे आभार मानले. 

कार्यालयाला पोलिसांचा गराडा-

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे चौकशीला येणार असल्याने कायदा सुव्यवस्था बिघडवू नये यासाठी रायगड लाच लुचपत कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अलिबाग पोलीस तसेच एक पलटून असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यालयात शिवसैनिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. माझ्या सारख्या सर्व सामान्य शिवसैनिकाला नोटीस पाठवून मोठे घबाड असल्याचे सरकारला वाटत आहे. मात्र त्याचा भ्रमनिरास होइल. सरकारच्या माध्यमातून मला मालमत्ते बाबत नोटीस देण्यात आलेली होती. त्यानुसार मी हजर राहून चौकशीला सामोरे गेलो आहे. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली असून २० जानेवारी पर्यंत मालमत्तेची सविस्तर माहिती दिलेल्या फार्म मध्ये भरून देणार आहे.

-आमदार राजन साळवी

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीShiv SenaशिवसेनाRajapurराजापुर