शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्र मणाच्या विळख्यात माथेरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:31 IST

माथेरान या स्थळावर मागील दशकांत लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पिढ्यान्पिढ्या येथे राहणाºया स्थानिकांनी झोपडपट्टी भागात सुरुवातीला

माथेरान : माथेरान या स्थळावर मागील दशकांत लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पिढ्यान्पिढ्या येथे राहणाºया स्थानिकांनी झोपडपट्टी भागात सुरुवातीला आपल्या लहान-मोठ्या झोपड्या बांधल्या होत्या. कालांतराने प्रत्येकाची आर्थिक सुबत्ता वाढल्यावर पक्की घरे बांधली. तसेच पर्यटकांना ऐन सुट्ट्यांच्या हंगामात खोल्या मिळत नाहीत, हॉटेल्सच्या रूमसुद्धा वेळप्रसंगी अपुºया पडतात, हे लक्षात घेऊन व्यवसायासाठी खोल्या वाढवल्या.गावातील ठरावीक २५४ प्लॉट हे बाजार भूखंड आहेत, तर बहुतांश क्षेत्र हे वनविभागाच्या अखत्यारित येत आहे; परंतु आजवर बांधलेल्या सर्वच झोपड्यांवर नगरपालिकेने अनधिकृत शिक्का मारलेला आहे. ज्याने-त्याने मनाला वाटेल त्याप्रमाणे बांधकामे केलेली आहेत. बांधकामे करताना सुरु वातीस संबंधित लोकप्रतिनिधींना त्यांनी सूचित केले होते. लोकप्रतिनिधींना ही बाब धोकादायक असल्याचे समजले होते; परंतु स्थानिकांच्या हट्टापुढे त्या वेळेस त्यांचासुद्धा नाईलाज होता. शेवटी याच पसाºयामुळे, तसेच काहींनी तर गल्ल्याबोळांवर सुद्धा अतिक्र मण केल्यामुळे हरित लवादाने एकूण ७००पेक्षा अधिक बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, त्यामुळे आता सर्वांची पळापळ सुरू झाली आहे. त्यातच गावातील काही मंडळींनी गावाच्या विरोधात कट कारस्थाने रचून पर्यावरणवाद्यांना येथील बांधकामांची इत्थंभूत माहिती दिली आहे. त्यामुळे हा कारवाईचा फास अधिक बळकट केला जात आहे.पूर्वी ठरावीक स्थानिक मंडळी झोपड्या बांधून वापर केवळ निवासी रहिवासासाठी करीत होते; परंतु माथेरान नगरीवर स्थानिकांनी हळूहळू अतिक्र मण केले आणि मिळेल तसे बांधकाम करून संपूर्ण परिसर बकाल के ला. काही भागांत तर पावसाचे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही, यामुळे पावसाळी पाणी घरांत शिरून मुंबई सारखीच परिस्थिती पाहावयास मिळते. अनेकांनी लोकप्रतिनिधींच्या वरदहस्ताने बांधकामे केलेली असली, तरीसुद्धा नियोजनाचा अभाव असल्यामुळे भविष्यात बिकट परिस्थिती होवू शकते.