शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

मिनीट्रेन फायद्यात की तोट्यात ?

By admin | Updated: November 13, 2016 01:22 IST

नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे ८ मे, २०१६ रोजी नॅरोगेज रुळावरून घसरल्यानंतर रेल्वेने मिनीट्रेनची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. सहा महिने उलटूनही

- कांता हाबळे, नेरळनेरळ-माथेरान मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे ८ मे, २०१६ रोजी नॅरोगेज रुळावरून घसरल्यानंतर रेल्वेने मिनीट्रेनची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. सहा महिने उलटूनही ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता, मिनीट्रेन तोट्यात असल्याने कारण देण्यात येत आहे. मात्र, दरवर्षी जवळपास अडीच लाख प्रवाशांची वाहतूक करणारी मिनीट्रेन तोट्यात कशी, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या चार वर्षांत मिनीट्रेन आणि शटल सेवेतील प्रवाशांची संख्या अडीच-तीन लाखांवर पोहोचली आहे. नेरळ-माथेरान मार्गावरील प्रवासी वाहतूक यातून मिळालेले उत्पन्न दरवर्षी जवळपास सव्वादोन ते अडीच कोटींच्या घरात आहे. मात्र, तरीही उत्पन्न न देणारा मार्ग म्हणून मिनीट्रेन बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे. नेरळ-माथेरान या २० कि.मी.च्या घाटमार्गावर मिनीट्रेन चालवली जाते. १९०७ मध्ये ब्रिटिश राजवट असताना सुरू झालेली मिनीट्रेन जागतिक वारसासाठी प्रस्तावित आहे. जागोजागी वळणे, अरुंद मार्गाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून पर्यटक आणि अभ्यासक याठिकाणी नेहमीच येत असतात. मिनिट्रेन सुरू झाल्यापासून पावसाळ्यात ती बंद ठेवण्याचा पायंडा आजतागायत कायम आहे. २९ सप्टेंबर, २०१२मध्ये मिनीट्रेनची शटल सेवा सुरू केल्यानंतर पावसाळ्यात अमन लॉज -माथेरान या शटल सेवेला पर्यटक तसेच स्थानिक प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. माथेरानमधील विद्यार्थी, तसेच दैनंदिन नोकरदार वर्ग, स्थानिकांनाही शटल सेवा सोयीची पडते. नॅरोगेज रु ळावरून प्रवासी डब्बे घसरल्याने ९ मे, २०१६ पासून हा मार्ग बंद करण्यात आला. मात्र, आता मार्ग तोट्यात असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता, मिनीट्रेनमधून दरवर्षी साधारण २ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर अमन लॉज-माथेरान शटल सेवेतून एक ते सव्वालाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यांच्या प्रवासातून साधारण अडीच कोटीचे उत्पन्न दरवर्षी मिळत आहे. त्यामुळे २० कि.मी. लांबीचा हा नॅरोगेज मार्ग तोट्यात कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मालवाहू गाडी सुरू केल्यास उत्पन्नात वाढ२९ सप्टेंबर, २०१२मध्ये सुरू करण्यात आलेल्या नेरळ-अमन लॉज शटल सेवेचा फायदा दरवर्षी साधारण लाखाहून अधिक प्रवाशांनी घेतला आहे. माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणी जाण्यास सर्व वाहनांना बंदी आहे, त्यामुळे मालवाहू गाडी सुरू केल्यास त्याचा परिणाम रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी होऊ शकतो.सहा महिन्यापासून मिनिट्रेन बंद आहे. यामुळे पर्यटनावर परिणाम परिणाम झाला आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढणारा पर्यटकांचा ओघ कमी झाल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पर्यटनक्षेत्र आणि पर्यावरण दृष्ट्या संरक्षित असल्याने माथेरानमध्ये रिक्षा टॅक्सी आदी वाहनांना बंदी आहे. त्यामुळे पर्यटकांना मिनिट्रेन, शटलाच आधार वाटतो. माथेरान आणि मिनीट्रेनचे १०० वर्षांपासून नाते निर्माण झाले आहे. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने मिनीट्रेन माथेरानचा अविभाज्य भाग बनली आहे. मागील काही वर्षांत आणि प्रामुख्याने शटल सेवा सुरू झाल्यापासून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तरी नेरळ-माथेरान मार्ग तोट्यात आहे, हे रेल्वेचे म्हणणे पटण्यासारखे नाही. - वंदना शिंदे, नगराध्यक्षा, माथेरानमिनीट्रेनचा मार्ग तोट्यात आहे म्हणून बंद केल्याचे बोलले जात असले तरी ते खरे कारण नाही. प्रवासी डब्बे रु ळावरून घसरल्याने वाहतूक बंद आहे. मिनीट्रेन कायमची बंद केली नसून नॅरोगेज मार्गावरील सर्व कामे पूर्ण करण्यात आल्यानंतर मिनीट्रेन सुरू करण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.- वाय. के. सिंग, रेल्वे वाहतूक नियंत्रक, कल्याण विभाग