शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मिनीट्रेनची शटल सेवा आजपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:43 IST

मिनीट्रेन १ मे व ८ मे २०१६ रोजी किरकोळ अपघात होऊन रेल्वे प्रशासनाने तत्काळ बंद के ली होती. यामुळे येथील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे.

माथेरान : येथील मिनीट्रेन १ मे व ८ मे २०१६ रोजी किरकोळ अपघात होऊन रेल्वे प्रशासनाने तत्काळ बंद के ली होती. यामुळे येथील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. मात्र नेरळ-माथेरान ही महाराष्ट्रातील एकमेव नॅरोगेज मिनीट्रेन ३० आॅक्टोबरपासून स्थानिकांसह पर्यटकांच्या दिमतीला धावणार आहे. त्यामुळे माथेरानकरांचे रेल रोको आंदोलन तूर्तास स्थगित केले असून, माथेरानकरांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.माथेरानची जीवनवाहिनी समजली जाणारी नेरळ-माथेरान मिनीट्रेन सुरक्षेचे कारण देत रेल्वे प्रशासनाने तडकाफडकी बंद केली. ही मिनीट्रेन सुरू व्हावी यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत याबाबत निवेदन दिले होते. आमदार सुरेश लाड यांनी शरद पवारांच्या सहकार्याने तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना विनंती केल्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी ही ट्रेन सुरू करण्यासाठी सात कोटी रु पये मंजूर करून कामाला सुरु वात झाली. रेल्वे सुरू होणार याबाबत रेल्वेकडून तारखांवर तारखा मिळत होत्या त्यामुळे हतबल झालेल्या माथेरानकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांनी माथेरानकरांच्या वतीने आंदोलन करण्याचे जाहीर केले. १ नोव्हेंबर रोजी नेरळ येथे रेल रोको होणार होता. त्या आंदोलनाच्या भीतीपोटी रेल्वे प्रशासनाने ३० आॅक्टोबर रोजी ही मिनीट्रेन सुरू केली.२९ आॅक्टोबरला या मिनीट्रेनची अंतिम चाचणी घेण्यात आली. ही मिनीट्रेन अधिकाºयांना घेऊन सकाळी ९.४५ ला नेरळहून सुटली. ती सर्व पाहणी करत जुमापट्टी,वॉटरपाइप व अमन लॉज ही स्टेशन घेत दुपारी १.१५ वाजता माथेरानमध्ये पोहोचली. नंतर माथेरान ते अमनलॉज स्टेशनपर्यंत शटलची चाचणी घेण्यात आली. यामध्ये रेल्वे प्रशासनाचे सी.डी. ओम जनरल आर. के.मोदी, डी. ओम. कोचिंगचे एम.के.गोयल, सिनियर डी.सी.एम. आदी अधिकाºयांनी पाहणी करून अंतिम अहवाल तयार करून माथेरान-अमन लॉज शटल सेवा ३० आॅक्टोबरला सुरू होईल, तसेच नेरळ-माथेरान मिनीट्रेन ही एप्रिल महिन्यात सुरू होईल, असे सांगितले. याप्रसंगी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजय सावंत,राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मनोज खेडकर,स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष सागर पाटील सह नागरिक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.