शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भूस्खलनाचा धोका जाणवल्यास जिल्ह्यातील गावांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 04:13 IST

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने रायगड जिल्ह्यातील १०३ भूस्खलनग्रस्त गावांपैकी २० अतितीव्र धोका असलेल्या गावांत मुसळधार पावसामुळे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली आहे.

- जयंत धुळपअलिबाग -  भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने रायगड जिल्ह्यातील १०३ भूस्खलनग्रस्त गावांपैकी २० अतितीव्र धोका असलेल्या गावांत मुसळधार पावसामुळे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली आहे. भूस्खलनाचा धोका जाणवल्यास गामस्थांचे स्थलांतरण करण्याकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेश दिले आहे. त्यानुसार २० अतितीव्र भूस्खलन धोका असलेल्या गावांत उप विभागीय महसूल अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी अशा पथकांनी पाहणी केली आहे.माती, गावांतील उतार, डोंगर कड्यांची भौगोलिक रचना, जलस्रोत, माती-जल परिणाम आदी वैज्ञानिक निकषांवर भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. त्या निकषांमध्ये अतिवृष्टीमुळे कोणत्याही गावांस सद्यस्थितीत धोकादायक परिस्थिती निर्माण नसल्याचा निष्कर्ष पाहणी पथकाने केल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनअधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.जिल्ह्यातील १०३ भूस्खलन धोकाग्रस्त गावांमध्ये ५०० मि.मी. वा त्यापेक्षा अधिक सतत अतिवृष्टी झाल्यास भूस्खलनाचा धोका उद्भवू शकतो, असे अनुमान भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने नमूद केले आहे. परिणामी, या गावांतील पर्जन्यमानावर सतत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.दहा गावांना मिळून एक पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या नोंदी सातत्याने घेण्यात येत आहेत.यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंतच्या काळात या १०३ भूस्खलन धोकाग्रस्त गावांपैकी एकाही गावात ५०० मि.मी.पेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले नसल्याने धोका उद्भवलेला नाही; परंतु आगामी काळात ५०० मि.मी.पेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यास संभाव्य धोक्यातून बचावासाठी तात्पुरते स्थलांतर करण्याचा पर्याय ग्रामस्थांनी मान्य केला आहे.एक लाख ग्रामस्थांच्या स्थलांतराची व्यवस्थातात्पुरत्या स्थलांतराकरिता आवश्यक सुरक्षित इमारतीची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून सज्ज ठेवण्यात आली आहे. या १०३ संभाव्य भूस्खलन धोकाग्रस्त गावांची एकूण लोकसंख्या सुमारे एक लाख असल्याचे पाठक यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड