शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये हजारो नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:47 IST

भूवैज्ञानिक सर्व्हेनुसार ४८ गावांना दरडीचा धोका; नोटिसा देऊन शासनाने झटकले हात

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील हजारो दरडग्रस्त कुटुंबांना महाडच्या महसूल विभागाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. संभाव्य दरडीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ही कार्यवाही केली आहे.नोटीस बजावून सुविधा न देणे म्हणजे दरडग्रस्तांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार आहे. आपत्ती व्यवस्थापन, दरडीपासून सुरक्षा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमावर लाखोची उधळण करणाºया शासनामार्फत २००५ पासून या नोटिसा बजावल्या जात आहेत.महाड तालुक्यात २००५ मध्ये रोहन, जुई, कोंडीवते आणि दासगावमध्ये दरडी कोसळून वित्त तसेच जीवितहानी झाली होती. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्याकडून केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे महाड तालुक्यात सध्या ४८ गावांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. या गावांमध्ये जवळपास १२०० कुटुंबांचा जीव धोक्यात आहे. महाड तालुक्यातील दासगाव, तुडील, चांढवे, कोंडीवते, मुमुर्शी, कुंबळे अशा अनेक मोठ्या गावांचा समावेश आहे. सर्वेक्षणानंतर शासनाने ४८ गावांतील हजारो कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. २००५ पासून प्रत्येक वर्षी सर्वेक्षण करत दरडग्रस्त गावातील ग्रामस्थांना नोटिसा देऊन शासन हात झटकण्याचे काम करत आहे. स्थलांतरित व्हा मात्र कुठे जायचे, कसे राहायचे, याबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षणमहाडमधील ४८ गावांत पावसाळ्यात दरडग्रस्त गावांतील कुटुंबांनी आपत्तीला तोंड कशा प्रकारे द्यायचे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून या गावांना जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे समाधान कडू -१८ गावे, हर्षद सोनावणे -१२ गावे आणि अनिकेत पाटील १८ गावांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शासनाकडून दरड संभाव्य ठिकाणी मार्गदर्शन फलक लावून नागरिकांना जनजागृती करण्यात आली आहे.दरडग्रस्त नागरिकांना आपत्ती काळात घ्यावयाची काळजी बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच गावांमध्ये जनजागृतीपर मार्गदर्शनही करण्यात आले आहे.- प्रदीप कुडळ,नायब तहसीलदार, महाडगेली १४ वर्षे शासन दासगावमधील दरडग्रस्तांना पूर्ण पैसे देऊ शकली नाही. ते नोटिसा बजावण्याच्या पलीकडे काय करणार? एकीकडे नोटिसा बजावल्या जातात, तर दुसरीकडे प्रशासन दरडग्रस्तांना केवळ आश्वासन देत आहे.- दिलीप उकिर्डे, सरपंच