शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी रस्त्याची चाळण

By admin | Updated: July 8, 2015 22:32 IST

रोहा-कोलाड रस्त्यावरील धाटावनजीक जीर्ण अवस्थेत असलेल्या दोन मोऱ्यांचे काम नव्याने सुरू असल्यामुळे याला पर्याय म्हणून एमआयडीसीअंतर्गत रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे

धाटाव : रोहा-कोलाड रस्त्यावरील धाटावनजीक जीर्ण अवस्थेत असलेल्या दोन मोऱ्यांचे काम नव्याने सुरू असल्यामुळे याला पर्याय म्हणून एमआयडीसीअंतर्गत रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र या रस्त्याला जागोजागी खड्डे पडल्याने एमआयडीसी रस्त्याची चाळण झाली आहे. अवघ्या दोन ते अडीच किमी अंतराचा वळसा घेत रोज प्रवास करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. यामुळे पाठीच्या मणक्यासह विविध आजारांना आमंत्रण मिळत असल्याने प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. सतत वर्दळ सुरू असलेल्या रोहा-कोलाड रस्त्यावरून हजारो हलक्या व अवजड वाहनांची रहदारी रात्रंदिवस सुरू असते. कोकणाकडे लांब पल्ल्याच्या गाड्या या रस्त्यावरून जातात. पर्यटक येथूनच अलिबाग, मुरुडकडे जात असतात. तर रोहा व कोलाड बाजूकडे कॉलेजमध्ये जाणारे तरुण व शालेय विद्यार्थ्यांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. ग्रामीण भागाबरोबर शहरातून अनेक कामगार औद्योगिक वसाहतीत कामासाठी येत असल्याने सध्या रस्त्यावरील मोऱ्यांच्या सुरू असलेल्या कामामुळे धाटाव एमआयडीसी अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. मात्र रस्त्याची झालेली दुर्दशा सर्वच प्रवाशांना डोकेदुखी झाली आहे. वाहने खड्ड्यांत आदळल्याने अनेक अपघात झाल्याचे समजते. रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. टी. अहिरे म्हणाले की, रोहा-कोलाड रस्त्यावरील धाटाव पोलीस ठाण्याजवळील मोरीचे काम पूर्ण झाल्यामुळे तो वाहतुकीसाठी खुला केला आहे. जैनवाडी नजीकच्या मोरीचे काम प्रगतिपथावर आहे. काम झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, धाटावचे उपअभियंता पी. ए. पांचाळ यांनी धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत नवीन डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव तयार असून तो वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)