शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा ग्रामपंचायतीत निवडणुकीचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:27 IST

तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.

म्हसळा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीतील अस्तित्वासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.तालुक्यात सध्या राष्ट्रवादीच प्रबळ असून गेल्या काही महिन्यांपासून परिसरात सभा घेण्यात येत आहेत. आमदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे व अन्य कार्यकर्ते यांनी आपली ताकद पणाला लावली आहे, तर भाजपानेही पालकमंत्री यांच्या दौऱ्याने विकासकामाला वेग आणला आहे. ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, पाणी, वीज, मूलभूत सुविधा याकडे विशेष लक्ष दिले आहे. रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास अजेंडा घेऊन या निवडणुका लढवणार असल्याचे समजते तर शिवसेना व काँग्रेस यांची युती असल्याने त्यांची ताकद देखील पणाला लागणार आहे. गतवेळी शिवसेनेला जास्त सरपंच प्राप्त झाले होते, तर ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीला प्राप्त झाले होते.मे महिन्यात होणाºया बारा ग्रामपंचायतींमध्ये वरवठणे, चिखलप, भेकºयाचा कोंड, कुडगाव, कोलवट, ठाकरोली, पांगलोळी, नेवरूळ, घूम, सालविंडे, जांभूळ, आडी, महाड खाडी तर तुरु ंबाडी, खरसई, देवघर रेवली लिपनी वावे, फलसप या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होत असून राजकीय पक्षांमध्ये चुरस वाढत आहे. सध्या वरवठणे, भेकाºयाचा कोंड, कोळवट, ठाकरोली, आडी महाड खाडी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. तर चिखलप, कुडगाव, पांगलोळी, नेवरूळ, घूम, साळविंडे या ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तर तालुक्यातील एकमेव जांभूळ ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. पांगलोळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता असून भविष्यात ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली जाईल, असे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख यांचे स्वप्न आहे.आडी महाड खाडी ही ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे शिवसेनेकडे असून इथे शिवसेनेत नाराजी पसरल्यामुळे याचा फायदा विरोधी पक्षाला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये अनेक वर्षे काम केलेले माजी तालुका प्रमुख समीर बनकर व विरोधी पक्षनेते बाळशेठ करडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे नक्कीच शिवसेना पक्षाला आपली सारी ताकद पणाला लावावी लागणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अली कौचाली यांना देखील आपली ग्रामपंचायत सहीसलामत ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तालुक्यात सध्या शिवसेना-काँग्रेस युती असल्याने पांगलोळी ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. दुसरीकडे जांभूळ ग्रामपंचायत गेली २५ वर्षे शेकापकडे आहे. त्यामुळे जांभूळ ग्रामपंचायत यावेळी आपल्याकडे ठेवण्यात कोण यशस्वी होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.