शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा राज्यातील पहिला प्रगत तालुका

By admin | Updated: January 28, 2017 02:56 IST

महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ रोजी अध्यादेश काढून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास लिहिता- वाचता आले पाहिजे

म्हसळा : महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ रोजी अध्यादेश काढून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास लिहिता- वाचता आले पाहिजे, एकही मूल अप्रगत राहता कामा नये, प्रत्येक वर्ग आणि शाळा १०० टक्के प्रगत झाली पाहिजे, असे आवाहन केले.ते डायट संस्थेचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांनी स्वीकारून रायगड जिल्हा शंभर टक्के प्रगत करण्याचे आवाहन स्वीकारले आणि ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत जिल्हा प्रगत न झाल्यास स्वत: नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्धार केला. त्यापैकी म्हसळा तालुका शंभर टक्के प्रगत झाला असल्याची घोषणा प्रजासत्ताक दिनी करण्यात आली.डॉ.गजानन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची प्रगत महाराष्ट्राची प्रेरणा घेऊन म्हसळा तालुका गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे, गटविकास अधिकारी नीलम गाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती यांनी जबाबदारी स्वीकारु न तालुका २६ जानेवारी २०१७ या भारतीय प्रजासत्ताक दिनी म्हसळा तालुका राज्यातील पहिला प्रगत तालुका म्हणून घोषित केला. यापूर्वी तंबाखूमुक्त म्हसळा तालुका म्हणून लौकिक मिळाला असून राज्यात तो पायलट प्रोजेक्ट ठरला होता.वास्तविक पहाता म्हसळा हा रायगड जिल्ह्यातील सर्वात दुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून शासनमान्य आहे. दुर्गम व डोंगराळ असल्यामुळे शालेय शिक्षणाखेरीज दुसरी कोणतीही सोय तालुक्यात नाही. त्यात शिक्षण विभागाची सर्व महत्वाची पदे गेली कित्येक वर्षे रिक्त आहेत.त्यात विशेष म्हणजे तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, दोन्ही विस्तार अधिकारी, गटसमन्वयक, ओ.एस., पोषण आहार अधीक्षक, सात केंद्रप्रमुख पदे रिक्त असतानाही प्रभारी गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे यांनी एवढी मोठी जबाबदारी स्वीकारून तालुक्याच्या शिरपेचात एक फार मोठा मानाचा तुरा रोवल्यामुळे तालुक्याचे विशेष कौतुक होत आहे. गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे यांनी हा उपक्र म यशस्वी व्हावा यासाठी अनेक क्रि याशील उपक्र म राबविले. या यशाबद्दल राज्याचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षण संचालक मगर आदी मान्यवरांनी तालुक्याचे विशेष अभिनंदन केले.(वार्ताहर)