शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळ्याला अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: May 31, 2017 06:15 IST

शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसाने एसटी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही चित्र म्हसळा स्थानकावर पाहावयास मिळाले. मंगळवारी शहरामध्ये वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली.३४ लाखांचे सफाई कंत्राट संपल्याने म्हसळा नगरपंचायतीमार्फत यंदा गटारांची सफाई करण्यात आली नाही. यामुळे शहरातील बहुतांश गटारे तुंबलेल्या अवस्थेत दिसत होती. या गटारांमधून वाहणारे पाणी शहरातून जाणाऱ्या म्हसळा-बोर्ली या राज्यमार्गावर आल्याने काहीकाळ राज्यमार्ग पाण्याखाली गेले होते. पावसाबरोबर वादळी वारा आल्याने शहरातील डॉ.चोचे यांच्या इमारतीवरील भलामोठा पत्र्याचा शेड रहदारीच्या रस्त्यावर चाळीस फूट उंचीवरून खाली कोसळला. शेड पडलेल्या ठिकाणी काही काळ लहान मुले खेळत होती. मात्र पाऊस पडण्यास सुरवात झाल्याने ती मुले आपापल्या घरी गेल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या पत्र्याने विद्युत वाहक तारा तुटून नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे बस प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना भिजलेल्या अवस्थेतच बसमधून प्रवास करावा लागला. नागरिकांनी घरात पाणी घुसू नये म्हणून ताडपत्रीच्या दुकानात गर्दी केली होती. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून छोटी छोटी डबकी तयार झाली होती. अशा रस्त्यावरून चालणे पादचारी आणि वाहनचालकांसाठी कठिण झाले होते. या अवकाळी पावसामुळे छत्री, रेनकोटच्या दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी के ली होती.महाडमध्ये जनजीवन विस्कळीतलोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड तालुक्यात मंगळवारी आलेल्या अवकाळी पावसाने साऱ्यांची तारांबळ उडवली. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते.मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा ४३ अंशाच्या वर गेला होता. नागरिक गरमीने हैराण झाले होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.ग्रामीण भागात तसेच शहरी भागात ठिकठिकाणी रस्त्यावर तसेच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. हा पाऊस शेतीला लाभदायक ठरणार आहे. गेल्या महिनाभरात तापलेली जमीन आणि तरवे भाजणीनंतर करण्यात आलेल्या पेरणीला हा पाऊस लाभदायक ठरणार असून पेरे चांगले रुजणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पेऱ्याला आवश्यक पाऊस पडल्याने बळीराजा अधिक शेतीच्या कामाला लागला आहे.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते. पावसाच्या बचावासाठी रेनकोट, छत्री खरेदी, तसेच खेड्यापाड्यातील गटार सफाई हे सर्व जूनच्या सुरुवातीला करण्यात येते. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी डबक्यामध्ये रस्त्यावर पाणी साचले तर मोठ्या प्रमाणात गटारे वाहू लागल्याने सफाई न झालेली गटारे सरळसरळ रस्त्यावरून ओलांडून वाहू लागली. याचा फटका नागरिकांना बसला. शेवटच्या टप्प्यात असताना वातावरणातील उष्णता आणि दमदार पावसामुळे आंबा नाशिवंत होणार आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.