शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीच्या सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:32 IST

खालापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नैना प्रकल्पाविरोधात नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांकडून निषेध करण्यात आला

वावोशी : खालापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नैना प्रकल्पाविरोधात नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांकडून निषेध करण्यात आला. शेकापच्या नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरुद्ध निषेध नोंदवित सभात्याग केला.खालापूर नगरपंचायत स्थापन झाल्यापासून ‘नैना’ प्रकल्पाचे वारे खालापुरात वाहत असून, खालापूर स्मार्ट सिटीसाठी नैनासोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानंतर ‘नैना’ प्रकल्पाचे खरे रूप नागरिक व शेतकºयांच्या समोर आले. या प्रकल्पास विरोध होण्यास सुरुवात झाली. खालापूर नगरपंचायतीकडून मागील दीड वर्ष तोंडी आश्वासनांच्या पलीकडे काही दिले गेले नसून, ‘नैना’ शेतकरी संघर्ष समिती व शिवसेना पक्षाचे नगरसेवक वारंवार नगराध्यक्षांकडे पत्रव्यवहार करून तोंडी चर्चा करून, ‘नैना’ प्रकल्पाविरोधात सर्वसाधारण सभेत विषय घेऊन नगरपंचायतीची भूमिका स्पष्ट व्हावी, म्हणून विनंती करूनही प्रत्येक वेळी आश्वासनांपलीकडे काहीही मिळाले नाही. तसेच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून सभेमध्ये मांडलेली मते, विषय व आक्षेप याची नोंद न घेता इतिवृत्तान्तामध्ये सर्वानुमते ठराव मंजूर, असे नमूद केले जाते. याबाबत लेखी तक्र ार करूनही वारंवार जाणून-बुजून पुनरावृत्ती केली जाते. तसेच १७ फे ब्रुवारीच्या सभेपूर्वी पत्रव्यवहार करून, ‘नैना’ प्रकल्पाबाबत विषयपत्रिकेवर विषय घेऊन त्यावर चर्चा होण्यासाठी शिवसेना पक्षाचे गटनेते व नगरसेवक व पहिल्यापासून या प्रकल्पास विरोध दर्शविणाºया नगरसेविका कांचन गव्हाणकर यांनी सभेच्या अध्यक्षांना विनंती अर्ज दिला. ‘नैना’ प्रकल्पाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी १७ फेब्रुवारीच्या सभेमध्ये विषय न घेतल्यामुळे, शिवसेना पक्षाचे विरोधी पक्षनेते दिलीप मणेर, धनंजय गावंड, बाळकृष्ण पाटील, अवधूत भुर्के, सुरेखा पवार व राष्ट्रवादीच्या नगरसेविका कांचन गव्हाणकर यांनी ही बाब लोकशाहीस धरून नसल्याने शेकापच्या नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरुद्ध निषेध नोंदवत सभात्याग केला.