शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाक्रूळ सरपंचपदी मेघना पाटील

By admin | Updated: November 12, 2015 01:48 IST

महिलांनी गावचा कारभार हाती घेणे ही मोठी बाब आहे. वाक्रूळ ग्रामपंचायतीमध्ये ११ जागी ११ महिला बिनविरोध निवडून आल्या.

पेण : महिलांनी गावचा कारभार हाती घेणे ही मोठी बाब आहे. वाक्रूळ ग्रामपंचायतीमध्ये ११ जागी ११ महिला बिनविरोध निवडून आल्या. निवडलेल्या त्या महिलांचा राज्यकारभार सोहळा मंगळवारी पार पडला. सरपंच पदावर मेघना पाटील यांची तर उपसरपंच पदावर रुपाली ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज आल्याने वाक्रू ळ सरपंच पदाची निवडणूक औपचारिकता ठरली होती.वाक्रूळ ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सरपंच निवडणूक प्रसंगी महिला सदस्यांमध्ये रेवती नाईक, मनिषा पाटील, हिरा लेंडी, राई पारधी, अंजना सुतार, शारदा शिद यांच्यासह समस्त वाक्रूळ ग्रामस्थ व गावचे मान्यवर उपस्थित होते. महिलांनाच ग्रामपंचायतीवर कारभार करण्याचा अधिकार दिल्याने गावच्या महिलांनीही या कार्यक्रमास मोठी संख्येने उपस्थित लावली.कामार्ली सरपंचपदावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापू दळवी यांच्या स्रुषा नीता दळवी यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदावर वैजयंता मुसळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या सरपंच निवडणुकीत पिठासन अधिकारी एस. टी पाटील यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गंगू सवर, संजना यादव, श्रावण हिलम, सुरेश पवार, मिनाक्षी पाटील, उमेश लांगी, वनिता भस्मा, सपना मालुसरे व जनार्दन खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. आंबेघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी प्रियंका लंबाळे यांनी तुषार मानकवळे यांचा ६ विरुद्ध ३ मतांनी पराभव करीत सरपंच म्हणून निवडून आल्या तर उपसरपंच निवडणुकीत हरेश वीर यांनी अरुण गायकर यांचा ६ विरुद्ध ३ मतांनी पराभव करीत उपसरपंचपद पटकावले. या ठिकाणी पिठासन अधिकारी सी . आर. पाटील यांनी काम पाहिले. वरील तीनही ग्रामपंचायतीवर शेकापच्या महिला सरपंच व उपसरपंच निवडून आल्याने शेकाप कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. (वार्ताहर)