शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयूच्या विद्यार्थ्यांबाबत माध्यमांची भूमिका अयोग्य

By admin | Updated: April 17, 2016 01:17 IST

विविध विद्यार्थी संघटनांची सक्रियता लाभलेल्या दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांबाबत केवळ प्रसारमाध्यमांच्या आधारे मते बनविणे अत्यंत अयोग्य असल्याचे प्रतिपादन

महाड : विविध विद्यार्थी संघटनांची सक्रियता लाभलेल्या दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांबाबत केवळ प्रसारमाध्यमांच्या आधारे मते बनविणे अत्यंत अयोग्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. पोलादपूर येथील सिद्धगिरी शिक्षण संस्थेच्या यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या गंगाबाई गांधी सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी मेधा पाटकर या शिक्षण व जीवन शाळा या विषयवर चर्चासत्रात बोलत होत्या. जेएनयूच्या निमंत्रणावरून त्या ठिकाणी आपण व्याख्यानासाठी गेले असता, व्याख्यानानंतरही सामाजिक कार्याप्रती प्रचंड उत्कंठा दाखवणारे विद्यार्थीही कोण्या अफजल गुरूबाबत काय म्हणाले, याबाबत माध्यमांतून प्रसारित होणारे प्रसारण ऐकून हे वेगळ्या प्रवृत्तींचे आहेत, असे मत होत नसल्याचेही पाटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.पाटकर म्हणाल्या, की महाराष्ट्रात अण्णासाहेब शिंदे, शिक्षण महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी शिक्षण संतांनी जे शैक्षणिक कार्य केले, ती भावना आज समाजात कितपत टिकून आहे, हे आपण जाणतो. नवखासगीकरण, नवव्यापारीकरण या संकल्पना पूर्वीच्या खासगीकरण आणि व्यापारीकरणापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाच्या झाल्यास ही बाब चिंतेची आहे. शिक्षण देणे शासनाचेच कर्तव्य आणि शिक्षण घेणे हा नागरिकांचा अधिकार आहे. पण शासनाला आपल्या कर्तव्याची जाणीव किती आहे, याबाबत अनेक शाळा या कागदोपत्रीच असल्याचा गौप्यस्फोट पाटकर यांनी यावेळी केला. आजही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असताना सर्व शिक्षा अभियानाचा गौरव करणे अयोग्य असल्याचेही पाटकर यांनी सांगितले. विविध आर्थिक, सामाजिक अडचणी सहन करताना देशातील विद्यार्थ्यांना एकावन्न प्रकारचा जातीयवाद भोगावा लागत असल्याचेही सर्वेक्षणाअंती आज आढळून आलेले आहे, अशी माहिती मेधा पाटकर यांनी यावेळी दिली.