शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अनिल घेरडीकर यांना पदक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:03 IST

कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून २०२० या वर्षाचे सर्वोत्कृष्ट तपास केल्याबद्दल पदक जाहीर

अलिबाग : परभणी जिल्ह्यातील जिंतूर विभागाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना केलेल्या उत्कृष्ट तपासाबाबत रायगड पोलीस दलातील कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून २०२० या वर्षाचे सर्वोत्कृष्ट तपास केल्याबद्दल पदक जाहीर झाले आहे.अनिल घेरडीकर हे २०१६ ते मार्च २०१९ या कालावधीत परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या वेळी बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ नोव्हेंबर २०१८ रोजी बोरी येथील एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणी बोरी पोलीस ठाणे येथे बलात्कार, पॉस्को व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये रोष वाढला होता. या पार्श्वभूमीवर या दुर्दैवी घटनेत कोणीही साक्षीदार नसताना गुन्ह्याचे तपासनीस अंमलदार अनिल घेरडीकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तांत्रिक माहिती गोळा करीत आरोपीला ताब्यात घेतले. गुन्ह्यातील सर्व पुरावे गोळा करून त्याच्याविरुद्ध परभणी जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणी अखेर न्यायालयाने संबंधित आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.या गुन्ह्याच्या तपास कामात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनिल घेरडीकर यांना केंद्र सरकारने पदक जाहीर केले आहे. याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच संपूर्ण रायगड पोलीस दलाकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.सासरे - जावयांना एकाच वेळी केंद्र स्तरावरील पदक जाहीर होण्याची ही पहिलीच वेळकर्जत : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्यातून केवळ १० अधिकाऱ्यांची या केंद्रीय स्तरावरील पदकासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात एसीपी पदावर काम करीत असलेल्या किसन गवळी यांनाही हे पदक जाहीर झाले असून, गवळी हे घेरडीकरांचे सासरे आहेत. एकाच वर्षी सासरे - जावयाला केंद्र स्तरावरील पदक मिळणे ही देशातील पहिलीच घटना आहे. संपूर्ण देशातून केवळ २१२ अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने निवडले आहे.