शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका चालकाविना बंद, माथेरान नगरपालिकेचे दुर्लक्ष, ठेकेदाराची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:39 IST

माथेरान पालिका क्षेत्रात इंधनावर चालणा-या वाहनांना बंदी आहे, मात्र विशेष बाब म्हणून रुग्णवाहिकेस येथे परवानगी आहे व ही रुग्णवाहिका ठेकेदारी पद्धतीने चालविली जाते. या ठेकेदाराची मुदत संपल्याने ही सेवा बंद झाली असल्याने रु ग्णांचे मात्र हाल होत असून, पर्यायी व्यवस्था करण्यास पालिका अपयशी ठरली आहे.

माथेरान : माथेरान पालिका क्षेत्रात इंधनावर चालणा-या वाहनांना बंदी आहे, मात्र विशेष बाब म्हणून रुग्णवाहिकेस येथे परवानगी आहे व ही रुग्णवाहिका ठेकेदारी पद्धतीने चालविली जाते. या ठेकेदाराची मुदत संपल्याने ही सेवा बंद झाली असल्याने रु ग्णांचे मात्र हाल होत असून, पर्यायी व्यवस्था करण्यास पालिका अपयशी ठरली आहे.ब्रिटिशकालीन पर्यटन क्षेत्र असलेल्या माथेरानचे क्षेत्रफळ ७.३५ स्क्वेअर कि.मी. आहे. येथील बहुतांशी भाग हा जंगलाने व्यापला आहे त्यामुळे येथे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी पोहचण्यास तारेवरची कसरत करावी लागते. तसेच येथे असलेल्या मर्यादित वैद्यकीय व्यवस्थेमुळे माथेरानकरांनी अनेक वर्षे पाठपुरावा करून माथेरानसाठी रुग्णवाहिका सेवा मिळविली, पण सेवा चालविण्यासाठी त्यांनी ठेकेदारी हा पर्याय अवलंबला व गेली अनेक वर्षे याच पद्धतीने ही सेवा सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून या ठेकेदारास त्याचे मानधन देण्यास पालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. सहा महिन्यांपूर्वीच ठेका संपल्यानंतरही करारनाम्यानुसार सहा महिन्यांपर्यंत नवीन ठेकेदार येईपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याची अट असल्याने त्याने ही सेवा सुरू ठेवली होती. मात्र त्याचा कार्यकाळही संपल्याने त्याने पुढे रु ग्णवाहिका चालविण्यास असमर्थता दर्शविली आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याचे मानधन देण्यास पालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे दाखवून चालढकल करण्यात येत असल्याने कंटाळून त्याने यापुढे रुग्णवाहिका करार न करण्याचा निर्णय घेतला. कालपासून रुग्णवाहिकेवर चालकच नसल्याने येथील रु ग्णांची परवड होत असून येथील रुग्णालयाशी संपर्क साधला असता रु ग्णवाहिका बंद असून १०८ रु ग्णवाहिकेशी संपर्क करा असे सांगण्यात येते.

आधीच व्हेंटिलेटरवरअसलेल्या वैद्यकीय सेवेत रुग्णवाहिका बंद असल्याने माथेरानकरांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. माथेरानकरांनी मोठ्या संघर्षानंतर मिळविलेली ही सेवा सरकारच्या अनास्थेमुळे बंद होतेय की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.मागील सहा महिन्यांपासून करार संपला असतानाही केवळ माथेरानमधील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सहा महिने ही सेवा सुरू ठेवली, पण पालिका अधिका-यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ही सेवा यापुढे सुरू ठेवण्यास असमर्थ आहे.- अविनाश कदम, रु ग्णवाहिका चालक

टॅग्स :Raigadरायगड