शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयफेल टॉवरपेक्षा सव्वादोनशे मीटर उंचीवरून धावणार माथेरानची फ्युुनिक्युलर रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 02:04 IST

प्रस्तावित तिकीट ४०० रुपये

- नारायण जाधव ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला जाण्यासाठी एमएमआरडीए ‘फ्युनिक्युलर रेल्वे’ सुरू करणार आहे. याबाबत केंद्र शासन अंगीकृत मे. राइट्स या संस्थेने तयार केलेल्या सुसाध्यता अहवालानुसार माथेरानची प्रस्तावित फ्युनिक्युलर रेल्वे फ्रान्सच्या आयफेल टॉवरपेक्षा सुमारे सव्वादोनशे मीटरहून अधिक उंचीवरून धावणार आहे. आयफेल टॉवरची उंची ३२४ मीटर असून, या प्रस्तावित फ्युनिक्युलरची उंची ५५० मीटर राहणार आहे.

माथेरान ते धोडनी मार्गावर ती धावणार असून, नवी मुंबईला अर्थात सिडकोच्या नैना क्षेत्राशी जोडण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर तिच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली. यामुळे लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून निविदा मागवून कार्यवाहीचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

१०३ कोटींचा प्रस्तावित खर्च

सध्या माथेरानला रस्ता किंवा रेल्वेने जाण्यासाठी नेरळ-माथेरान हा एकमेव मार्ग आहे. यामुळे या थंड हवेच्या ठिकाणाला नवी मुंबईच्या दिशेने जोडण्यासाठी एमएमआरडीएने सर्वप्रथम २००९ साली मान्यता दिली होती. त्यानंतर, सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी मे. राइट्स या संस्थेची नियुक्ती केली. तिच्या अहवालानुसार, माथेरान ते धोडनी मार्गावरील १.९ किमीच्या घनदाट वनांमधून ती ५५० मीटर उंचीवरून धावणार असून, तिचा खर्च भारतीय चलनानुसार १०२ कोटी ९७ लाख, तर विदेशी चलनात १९५ कोटी चार लाख प्रस्तावित केला आहे.

पहिल्या वर्षी साडेचार लाख प्रवासी

धोडनी-माथेरान मार्गावर पहिल्या वर्षी चार लाख ४७ हजार ४७६, तर विसाव्या वर्षी सात लाख १७ हजार ३५७ प्रवासी प्रस्तावित करून मे. राइट्स यांनी प्रत्येकाला ४०० रुपये, तर लहान मुलांसाठी २०० रुपये तिकीटदर निश्चित केले आहेत.सध्याची टॉय ट्रेन एमएमआरडीएचालविणार?

सध्या नेरळ-माथेरान मार्गावर धावणाऱ्या टॉय ट्रेनमध्ये सुधारणा करून ती प्राधिकरणामार्फत चालविण्याबाबत पडताळणी करण्याचेही या वेळी ठरले. तसेच हाजी मलंगची फ्युनिक्युलर रेल्वेही एमएमआरडीएने ताब्यात घेण्याचे नगरविकासमंत्र्यांनी सूचित के ले आहे.

इको-सेन्सिटिव्हचा अडथळासार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावरील निविदांना प्रतिसाद न मिळाल्यास खरेदी बांधकाम विकास तत्त्वावरील अंमलबजावणीसही या वेळी मान्यता देण्यात आली. इको-सेन्सिटिव्हचा राहणारा अडथळा तिच्या मार्गात असून तो दूर करणे एक आव्हान आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान