शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाहतुकीच्या कायद्याने माथेरानकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:23 IST

बदलाची गरज : जीवनावश्यक वस्तू गावाच्या मध्यवर्ती भागात आणण्याची मागणी

माथेरान : माथेरानमध्ये येण्यासाठी सध्या नेरळ मार्गे येणे हा एकच पर्याय आहे. तर गावात पर्यटकांना वाहून नेण्यासाठी अंतर्गत वाहतुकीसाठी हात रिक्षा आणि घोडे हीच व्यवस्था कार्यान्वित आहे. यासाठी आगामी काळात हात रिक्षा चालकांना या अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळेल तेव्हा मिळेल मात्र सध्या स्थानिकांसाठी काही पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे. दस्तुरी नाका येथून जीवनावश्यक वस्तू आणि इमारतीसाठी लागणारे साहित्य जे सर्वसामान्य लोकांना वाढीव दराने खरेदी करणे परवडणारे नाही, यामुळे ते तरी निदान गावाच्या मध्यवर्ती भागात आणावे अशीच मागणी स्थानिकांकडून होत आहे.

ब्रिटिश काळापासून असलेली नियमावली आणि जाचक अटी मोडीत काढून येथील कायद्यात सुधारणा केल्याशिवाय हे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करणार नाही. स्वातंत्र्य पूर्वार्धात स्थापन करण्यात आलेल्या माथेरानमध्ये स्वातंत्र्याच्यानंतर सुद्धा आजवर वाहतुकीची सोय उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दस्तुरी या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सर्वच प्रकारचा माल येत असून पुढील वाहतुकीची व्यवस्था ही घोड्यावर आणि मानवी हातगाडीच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे खूपच महाग आणि वाढीव दराने वस्तू खरेदी कराव्या लागतात. यासाठी निदान मालवाहतूक टेम्पो हे गावाच्या मध्यवर्ती भागात आणल्यास सर्वांनाच सोयीस्कर होऊ शकते अशीच मागणी सध्या जोर धरू लागली आहे. माथेरानचा शोध १८५० मध्ये लागल्यावर तेव्हापासून ते आजतागायत सर्वच प्रकारचे सामान हे घोडा आणि हातगाडीमधून येत आहे.

येथील अनेक विकासकामे आजही प्रलंबित आहेत. रस्ते दुरु स्तीसाठी लागणारे जांभे दगड, पेव्हर ब्लॉक अथवा रेती, सिमेंट, खडी, लोखंड त्याचप्रमाणे अन्य सामान हातगाडी आणि घोड्यावर येत असते. तर जीवनावश्यक वस्तू सुध्दा अशाचप्रकारे आणल्या जातात. ही खूपच खर्चिक बाब असून ऐनवेळी पावसाळ्यात मजुरांअभावी माल दस्तुरी येथे भिजत असतो. त्यामुळे मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. स्थानिक नागरिक आजही एखाद्या पर्यायी व्यवस्थेच्या आशेवर आहेत. परंतु शासनाला याबाबत काहीच स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे. अनेक भागातून येथे येण्यासाठी मार्ग उपलब्ध होऊ शकतात, याचा शासनाने सकारात्मक विचार करून स्थानिकांची समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

माथेरान मिनीट्रेनमधील एक मालवाहू बोगी रेल्वेने मालवाहतूक करण्यासाठी दिल्यास जीवनावश्यक वस्तू आणणे सोयीस्कर होऊ शकते यासाठी आम्ही स्वत: आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे हे सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत.- प्रेरणा सावंत,नगराध्यक्षा

टॅग्स :Matheranमाथेरान