शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

माथेरानचा बंद यशस्वी

By admin | Updated: January 31, 2017 03:38 IST

येथील माथेरान बचाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने हरित लवादाने २००३ ची बांधकामे हटविण्याच्या दिलेल्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारून

माथेरान : येथील माथेरान बचाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने हरित लवादाने २००३ ची बांधकामे हटविण्याच्या दिलेल्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारून या निर्णयाविरोधात आपली आक्र मकता दाखवली. परंतु माथेरान हे पर्यटन स्थळ असल्याने या बंदमध्ये पर्यटकांचे अतोनात हाल झाले.फेब्रुवारी २००३ मध्ये माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले त्यानुसार माथेरानमध्ये बांधकामांना परवानगी दिली जात नाही याचा आधार घेत मुंबई स्थित बॉम्बे एन्वायरमेंट अ‍ॅक्शन ग्रुपने एप्रिल २०१६ मध्ये बांधकामाविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका स्थानिकांविरोधात न करता शासन आणि अधिकारी यांच्याविरोधात केल्यामुळे याबाबत स्थानिकांना काहीच माहिती नसल्याचे संघर्ष समितीने सांगितले. तसेच २००३ नंतर जितकी बांधकामे झाली आहेत ती त्वरित हटवून तसा अहवाल हरित लवादास सादर करावा असा आदेश दिल्याने अधिकारी वर्गाने बांधकामे हटविण्यासाठी तयारी केली आहे. ॅयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथेरान संघर्ष समितीने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. या बंदला सर्व हॉटेलधारक, लॉजधारक, दुकानदार, घोडेवाले, रिक्षावाले, टॅक्सी चालक-मालक संघटनेने पाठिंबा दर्शवून शंभर टक्के प्रतिसाद दिला. परंतु पर्यटकांचे अतोनात हाल झाले.न्यायालयात घ्यावी लागणार धावयाबाबतीत सर्वच नागरिकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन यातून काहीतरी सुवर्णमध्य काढावा असे सूचित केले. परंतु शासनाचा आदेश आम्हाला तसेच पोलीस खात्याला पाळणे बंधनकारक असल्याचे अधीक्षक संतोष शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आचरेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माथेरानकरांना आगामी कारवाई टाळण्यासाठी स्थगिती आणण्यासाठी केवळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या सहीनिशी मुख्यमंत्री फडणवीस यांना कारवाई थांबविण्यासाठी निवेदन देऊन मार्ग काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. एकंदरीतच सर्वच दुकाने तसेच दैनंदिन व्यवहार बंद केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. बॉम्बे एन्वायरमेंट ग्रुपने हरित लवादात याचिका दाखल करून न्यायालयाने जी २००३ ची बांधकामे हटविण्याचा निर्णय दिला आहे तो आमच्यासाठी अतिशय दु:खद निर्णय आहे. आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षाअन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मूलभूत अधिकार असताना हे पर्यावरणवादी आमचा अधिकार हिरावू पाहत आहेत. येथील स्थानिक भूमिपुत्रच पर्यावरण अबाधित राखत आलेला आहे. परंतु हे पर्यावरणवादी पर्यावरण वाचविण्यासाठी एक झाड सुद्धा माथेरानमध्ये लावत नाहीत यामुळे त्यांना पर्यावरणाशी काही देणे घेणे नाही, यांना जर पर्यावरणाची एवढी काळजी आहे तर मुंबईमधील प्रदूषण कमी करा.- प्रसाद सावंत,सर्वपक्षीय संघर्ष समिती