शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरानला पसंती, पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:58 IST

Matheran : येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर आकर्षक विद्युत रोशणाई त्याचप्रमाणे नाताळनिमित्ताने बच्चेकंपनीच्या लाडक्या सांताक्लॉजचे चलचित्र खऱ्याखुऱ्या रूपाने स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.

माथेरान : सन २०२० हे कोरोना पर्व असल्याने लॉकडाऊनच्या काळात अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. नुकताच २ सप्टेंबरला सर्वत्र अनलॉक केल्यामुळे भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून अत्यंत कठीण परिस्थितीत घरातच कोरोनाकाळ घालवून अखेरीस या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबई-पुण्यापासून अगदी जवळच्या निसर्गरम्य थंड हवेच्या माथेरान या पर्यटनस्थळाला पसंती दिली आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर आकर्षक विद्युत रोशणाई त्याचप्रमाणे नाताळनिमित्ताने बच्चेकंपनीच्या लाडक्या सांताक्लॉजचे चलचित्र खऱ्याखुऱ्या रूपाने स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.माथेरानच्या आजवरच्या एकंदरीत राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींनी अद्याप कधीच अशा प्रकारे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले नव्हते. परंतु मागील चार वर्षांपासून येथे काही ना काही बदल हमखास पाहावयास मिळत आहेत.  विविध ठिकाणी मेरी ख्रिसमस तसेच हॅप्पी न्यू ईअरच्या पताका झळकत आहेत. त्यामुळे पर्यटकांनासुद्धा या अभूतपूर्व स्वागत सोहळ्याने आनंद होत आहे.

आकर्षक सजावट या वर्षी पहिल्यांदाच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि पर्यटकांना माथेरानकडे आकर्षित करण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून गटनेते प्रसाद सावंत यांनी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या सहकार्याने सांताक्लॉजचे एक अलौकिक स्वागतदृश्य उभारले आहे. विविध ठिकाणी मेरी ख्रिसमस तसेच हॅप्पी न्यू ईअरच्या पताका झळकत आहेत. आकर्षक सजावट केली आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान