शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान पालिकेस ई-रिक्षा खरेदीसाठी मान्यता, ई-टेंडरिंगच्या माध्यमातून खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 12:03 IST

Matheran: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरान सनियंत्रण समिती कार्यरत आहे. याच समितीच्या २६ मे रोजी झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर चर्चा झाली.

माथेरान : सर्वोच्च न्यायालयाने १२ मे रोजी माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी राज्य सरकारचे वकील राहुल चिटणीस यांनी सनियंत्रण समितीच्या निर्णयानुसार प्रथम तीन महिने तीन रिक्षाची ट्रायल्स घेण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. राहुल चिटणीस यांनी माथेरानचे रस्ते चढ-उताराचे असल्याने तांत्रिकदृष्ट्या कोणती गाडी चालू शकेल, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयात सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरान सनियंत्रण समिती कार्यरत आहे. याच समितीच्या २६ मे रोजी झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर चर्चा झाली. समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी (निवृत्त सनदी अधिकारी) व समितीचे मानद सचिव व रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी माथेरान नगरपालिकेस  चाचणीसाठी ई-टेंडरिंगच्या माध्यमातून तीन ई-रिक्षा खरेदीसाठी मान्यता दिली आहे.पालिकेच्या प्रशासक सुरेखा भणगे यांनी २६ मे रोजी नगरविकास खात्यास पत्र लिहून ई-रिक्षाच्या चाचण्या सुरू करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार नगरविकास खात्याचे कक्ष अधिकारी रश्मीकांत इंगोले यांनी आदेश जारी केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात तीन महिन्यांनंतर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे व कशा प्रकारे ई-रिक्षा सुरू केल्या जातील, याची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात येणार आहे.सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे (निवृत्त शिक्षक) यांनी माथेरानच्या हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळावी व त्यांना सन्मानाचे व आरोग्यदायी जीवन जगण्याची संधी मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ई-रिक्षा सुरू झाल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी यांची पायपीट वाचेल. माथेरानकरांसह पर्यटकसुद्धा स्वस्त दरात आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा, यासाठी मोठ्या उत्सुकतेने ई-रिक्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

काही दिवसांपूर्वी ई-रिक्षाची माथेरान घाटात चाचणी घेण्यात आली होती. नेरळ माथेरान प्रवेशद्वारापासून थेट वॉटर पाइप रेल्वे स्टेशनपर्यंत तिघांना घेऊन ही ई-रिक्षा अगदी सहजपणे अवघड घाटरस्त्यावर चढली. त्यामुळे नक्कीच हे वाहन सर्वांनाच फायदेशीर ठरणार आहे, यात शंकाच नाही.- शकील पटेल, अध्यक्ष श्रमिक रिक्षा संघटना

टॅग्स :Matheranमाथेरान