शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

माथेरानला पर्यायी मार्गाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 03:19 IST

थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानचे नाव घेतले जाते, माथेरान प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ आहे, अशी माथेरानची ओळख आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहराच्या मध्यवर्तीचे

कर्जत : थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानचे नाव घेतले जाते, माथेरान प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ आहे, अशी माथेरानची ओळख आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहराच्या मध्यवर्तीचे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे. सुटीच्या काळात पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये फिरायला येतात. शासनाचे जाचक नियम व माथेरानमधील अपुरी जागा, सुविधांचा अभाव यामुळे माथेरान तसे अविकसितच आहे, माथेरानच्या पर्यटनात वाढ हवी असेल तर माथेरानचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे माथेरानला जाण्यासाठी पर्यायी मार्ग झाला पाहिजे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.होळी सणापासून चार -पाच दिवस सुट्या लागून आल्यामुळे सर्वच पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलून गेली. मात्र माथेरान हे पर्यटन स्थळ उंच ठिकाणी असल्याने त्याठिकाणी जाण्यासाठी एकच मार्ग आहे, माथेरानमध्ये वाहनास बंदी आहे त्यामुळे पार्किंग ठिकाणी वाहने उभी करून आत जावे लागते. पार्किंगची जागा कमी असल्याने वाहने उभी करण्यास अडचण येत आहे. माथेरानमध्ये हॉटेलची संख्या आणि राहण्याची व्यवस्था याची कमतरता असल्यामुळे तीन ते चार दिवस माथेरान प्रशासनावर व पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण पडला होता. हे कमी करण्यासाठी माथेरानला पर्यायी मार्गाची गरज आहे. १९०७ मध्ये माथेरानची मिनी ट्रेन सर आदमजी पिरबॉय यांनी चालू केली त्यानंतर खऱ्या अर्थाने माथेरान या पर्यटन स्थळाची ओळख जगभर झाली. त्यानंतर माथेरान मधील स्थानिकांनी श्रमदान करून नेरळ - माथेरान पायवाट तयार केली त्यामुळे मग पर्यटक माथेरानमध्ये पायवाटेव्दारे येऊ लागले. कालांतराने रस्ता मोठा करण्यात आला त्यावर १९७८ मध्ये टॅक्सी सेवा सुरु झाली. टॅक्सी सेवा सुरु झाल्याने माथेरानच्या पर्यटनाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. पनवेल- माथेरान रस्ता व्हावा याकरिता माथेरानचे नगरसेवक दिनेश सुतार यांनी श्रमदान केले होते तर माजी नगरसेवक अरविंद शेलार यांनी हा रस्ता व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न केला होता. माथेरानमधील अनेकांनी प्रयत्न केले. या रस्त्याचा सर्व्हे झाल्याचे समजते मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे हा रस्ता अद्याप बाकी आहे. (वार्ताहर)व्यवसायावर परिणामदस्तुरी नाक्यावर पार्किंगची अपुरी व्यवस्था, माथेरान घाटात वाहतुकीची कोंडी त्यामुळे अनेक पर्यटकांना माघारी फिरावे लागते त्याचा थेट परिणाम येथील व्यवसायावर होत असून माथेरान साठी दुसरा पर्यायी मार्ग असावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. धोधानी - माथेरान हा पाच किलोमीटरचा रस्ता शासनाने विकसित केल्यास पर्यटकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो. तसेच चौक मार्गे रामबाग पाइंट पर्यंतचा रस्ता विकसित केल्यास हाही मार्ग लाभदायक ठरु शकतो.