शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान, काशीद, मांडवा, उणेगाव पर्यटक सुविधांनी होणार सुसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:06 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी होणार वितरित : आठ वर्षे रखडलेली कामे मार्गी

रायगड : पर्यटनस्थळांच्या पायाभूत विकासासाठी गेल्या आठ वर्षांपासून रखडलेला तब्बल साडेपाच काेटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळणार आहे. यामुळे  माथेरान, काशीद, मांडवा, उणेगाव पर्यटक सुविधांनी सुसज्ज होणार आहेत. हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरीत करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळाच्या विकासाला गती येणार असल्याचे बाेलले जाते. 

पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सन २०१२-१३ ते सन २०१९-२० या कालावधीत रायगड जिल्ह्यातील मंजूर झालेल्या पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी आवश्यक उर्वरित निधी मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केला हाेता. आता सरकारने सन २०२०-२१ या वर्षासाठी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे ५ कोटी ४५ लक्ष ४२ हजार निधी निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.सन २०१३-१४ मध्ये मान्यता मिळालेल्या माथेरान येथील पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झालेल्या २४ कोटी रुपये निधीपैकी पूर्वी २१ कोटी ४३ लाख रुपये  निधी वितरित करण्यात आला होता तर आता उर्वरित २ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनमान्यता मिळाली आहे.

सन २०१७-१८ मध्ये मान्यता मिळालेल्या मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी सुशोभीकरण करणे या कामांतर्गंत जमीन सपाटीकरणकरिता ५ हजार, जमिनीच्या पायाभरणीसाठी खोदकाम करण्यासाठी ४४ हजार रुपये, बांधकामासाठी मुरुम, ग्रॅनाईट दगड यांचा पुरवठा करणे याकरिता ३ लाख २६ हजार, इमारतीच्या पायाभरणीसाठी सिमेंट काँक्रीटीकरण करणे ५ लाख ९५ हजार, ग्रॅनाईट, दगड, वाळू यांचा पुरवठा करणे याकरिता ९ लाख ९७ हजार, रंगरंगोटी आणि कोरीव कामासाठी ग्रॅनाईट प्लेटचा पुरवठा याकरिता ८ हजार रुपये, टेस्टिंग चार्जेस फॉर मटेरीयल याकरिता ३ हजार रुपये अशा एकूण १९ लाख ९९ हजार निधीपैकी पूर्वी १० लाख निधी वितरित करण्यात आला होता तर आता उर्वरित ९ लाख ९९ हजार इतका निधी वितरित करण्यास सरकारची मान्यता मिळाली आहे.

सन २०१७-१८ अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे ग्रामपंचायत धोकवडे आर.सी.एफ. जेट्टीकडे जाणारा रस्ता तयार करणे, या कामांतर्गत रस्त्यासाठी मटेरियल पुरवठा याकरिता ८ लाख ७६ हजार, २० मी. मी. जाडीचा बिटूसम मुरुड (सर्व मटेरियलसहित) याकरिता ८ लाख ६० हजार रुपये, बिटूसम लिक्विड सील कोट (सर्व मटेरियलसहित) याकरिता २ लाख ५४ हजार रुपये, २५ मी. मी. जाडीचा मार्बल पुरवठा याकरिता १ हजार रुपये, संकीर्ण कामांकरिता  ५ हजार रुपये  अशा एकूण १९ लाख ९६ हजार रुपयांच्या निधीपैकी १० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता तर आता उर्वरित ९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी 

वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे. उणेगाव फाटा, गोरेगाव (ता. माणगाव) येथील गावतळ्याचे सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी तलावाचे खोलीकरण, संरक्षक भिंत, व्हिप होल्स, पदपथ, रेलिंग, बसण्याची व्यवस्था आदी याकरिता २ कोटी ५१ लाख ११ हजार रुपये, टेस्ट रिपोर्ट याकरिता १ लाख ५० हजार रुपये, बगीचा आणि कारंजे याकरिता ५ लाख रुपये, कामगारांचा विमा याकरिता दाेन लाख रुपये ५७ हजार, आकस्मिकता निधीकरिता १० लाख ३१ हजार रुपये, विद्युतीकरण (विद्युत जोडणीसह) याकरिता १० लाख रुपये, सल्लागार आणि वास्तुशास्त्रज्ञ याकरिता ५ लाख १५ हजार रुपये, जीएसटी करिता ३२ लाख ४९ हजार रुपये अशा एकूण ३ कोटी १८ लाख ४७ हजार रुपये निधी पैकी पूर्वी ५० लाख रुपये निधी वितरित करण्यात आला होता. तर आता उर्वरित १ कोटी ८३ लाख ४७ हजार इतका निधी वितरित करण्यास सरकारने हिरवा कंदील दाखविला.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील माथेरान, काशीद, मांडवा तसेच उणेगाव येथील विविध कामांकरिता शासनाकडून एकूण २७ कोटी ५८ लाख ४२ हजार निधीपैकी पूर्वी २२ कोटी १३ लाख निधी वितरित करण्यात आला होता तर आता उर्वरित ५ कोटी ४५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.