शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानला अघोषित लॉकडाऊनचा फटका; पर्यटकांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 01:47 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम

माथेरान : कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने राज्यातील पर्यटनही प्रभावित झाले असून पर्यटनास बाहेर पडणाऱ्या पर्यटकांची संख्या घटू लागल्याने त्याचा फटका पर्यटन क्षेत्रांना बसू लागला आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये घट झाली असून मुख्य बाजारपेठेत गेल्यावर्षीच्या लॉकडाऊन सदृश परिस्थिती पाहावयास मिळत आहे.

माथेरानमधील सर्वच आर्थिक व्यवहार हे पर्यटनावर अवलंबून आहेत. पर्यटकांची संख्या कमी होताच येथील आर्थिक घडी बिघडत असते गेल्यावर्षी ऐन पर्यटन हंगामामध्ये लॉकडाऊन लागल्याने येथील व्यावसायिक अजूनही कर्जाच्या बोजाखाली वावरत आहेत. या काळातील वीज व पाणी बिले भरण्यासाठी अजूनही झगडत आहेत. त्यातच देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा थेट परिणाम येथील पर्यटनावर झाला आहे.  येथील बहुतेक हॉटेलमधील आगाऊ बुकिंग रद्द झाल्या आहेत व प्रतिसाद ही खूप कमी झाल्याने माथेरानकरांसाठी हे एक प्रकारे अघोषित लॉकडाऊनच ठरत आहे. त्यातच वीज वितरण व जलप्राधिकारणाने देयके न भरल्यामुळे जोडण्या कापण्यास सुरुवात केल्याने माथेरानकरांच्या चिंतेत अजूनच भर पडलेली आहे.

लॉकडाऊन काळातील बिलांवर सूट मिळावी या करिता माथेरानकर मागणी करीत असताना आता त्यांच्या जोडण्याचा कापावयास निघाल्याने दाद तरी कोणाकडे, मागायची असा प्रश्न माथेरानमधील जनता विचारत आहे. महावितरणाने माथेरानमधील अनेक हॉटेल व व्यावसायिकांची वीज जोडणी खंडित केली आहे तर मार्च अखेरीपर्यंत वसुलीसाठी शासनाची इतर खातीही सरसावली असून महसूल व पालिका प्रशासनही वसुलीसाठी माथेरानमध्ये फिरू लागल्याने स्थानिकांच्या चिंतेत भर पडू लागली आहे.  कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊनचे ढग डोक्यावर फिरत असताना आता वसुलीवाल्यांना चिंताही लागली असल्याने माथेरांकरांच्या चिंतेत अधिक भर पडू लागली आहे. आधीच कर्जाचा बोजा आलेल्या व्यापाऱ्यांनी यावर्षीच्या पर्यटन हंगामाकडे डोळे लावलेले असताना या अघोषित लॉकडाऊनमुळे घटलेल्या पर्यटन संख्येमुळे चिंतेत टाकले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या