शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:28 IST

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये माथेरान नगरपालिकेचा प्रथम क्रमांक यावा यासाठी माथेरानकर आगामी काळातील विकासासाठी एकदिलाने स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले

मुकुंद रांजणेमाथेरान : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये माथेरान नगरपालिकेचा प्रथम क्रमांक यावा यासाठी माथेरानकर आगामी काळातील विकासासाठी एकदिलाने स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले असूनही, एक प्रकारे प्रतिष्ठेची लढाई सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वपक्षीय मंडळी यामध्ये समाविष्ट झाल्याने हे दिवससुद्धा निवडणुकीप्रमाणे भासत आहेत. विशेष म्हणजे सर्वच समाजाच्या मंडळींनी स्वत:हून या अभियानात झोकून दिले आहे. दोन दिवस ग्रामस्थांच्या सहकार्याने केल्या जात असलेल्या स्वच्छता मोहिमेला खºया अर्थाने रंगत आली आहे.हॉटेलधारक, व्यापारी मंडळे, विविध सामाजिक संघटना यात उतरले आहेत. मराठा, मुस्लीम, चर्मकार, वाल्मीकी, धनगर यासह अन्य घटक पहिल्यांदाच गावाच्या स्वच्छतेसाठी गटारात उतरून सुका कचरा संकलन करीत आहेत. महिलांनीसुद्धा पुढाकार घेतला असून विभागवार स्वच्छता केली जात आहे. एकूण शंभरपेक्षाही अधिक जणांनी एकूण अडीचशे गोणी कचरा जमा केलेला आहे. पत्रकार मंडळींनी सुद्धा दोन गोण्या कचरा उचलून आपल्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. इंदिरा गांधी नगर ते हुतात्मा भाई कोतवाल नगर, संत रोहिदास नगर, पंचवटी नगर, संत गाडगे बाबा रोड व अन्य भागात असलेल्या गल्लीबोळात जाऊन सुका कचरा जमा करीत आहेत. रेल्वे स्टेशनमधील मद्यपींच्या मोठ्या प्रमाणात बाटल्यांचा साठलेला खच, गुटख्याची पाकिटे, प्लास्टिक पिशव्या भरण्यासाठी स्वत: नगरसेवक शिवाजी शिंदे, नगरसेविका वर्षा रॉड्रिक्स, सामाजिक युवा कार्यकर्ते हर्ष शिंदे, सनी रॉड्रिक्स यांनी पुढाकार घेतला. या अभियानात विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीसह नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे, शिक्षण सभापती राकेश चौधरी, बांधकाम सभापती रूपाली आखाडे, ज्योती सोणावळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येक नागरिकाने जाता-येता रस्त्यावर पडणारा सुका कचरा, प्लास्टिक कागद हे स्वत: उचलून कचराकुंडीत टाकल्यास त्यांचे अनुकरण अन्य नागरिक करतील. पर्यटकसुद्धा आपल्याजवळील कचरा इतरत्र फेकणार नाहीत. यासाठी नागरिकांची स्वत:च्या घरापासून स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता असणे अत्यंत गरजेचे आहे.- प्रकाश सुतार,माजी नगरसेवक, माथेरानतीन ते चार दिवसांपासून शेकडो हात नियमितपणे माथेरान स्वच्छ, सुंदर, हरित करण्यासाठी झटत आहेत. स्वच्छता अभियानातील नागरिकांचे हे सर्वाधिक योगदान पुढील यशाचे द्योतक आहे.- प्रसाद सावंत, गटनेते,माथेरान नगरपालिकामाथेरानचे नागरिक, श्रमिक तसेच सर्व क्षेत्रातील मंडळी, सर्व समाज मनापासून खूपच मेहनत घेत आहेत. येणाºया पावसाळ्यापूर्वी माथेरान डम्पिंग ग्राउंडचे माथेरानमधील सर्वात सुंदर गार्डनमध्ये रूपांतर होईल.- डॉ.सागर घोलप, मुख्याधिकारी, माथेरान नगरपालिकाहातरिक्षा चालकांचा सहभागतीन राज्यांत स्वच्छता सर्वेक्षणानुसार कोकण विभागासाठी एकूण दोन हजार नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियानासाठी १५ कोटी रु पये प्रथम क्र मांकाचे बक्षीस शासनाने जाहीर केले.आपल्या इवल्याशा माथेरान सारख्या दुर्गम पर्यटनस्थळाला मिळाल्यास हे स्थळ सर्वांगीणदृष्ट्या समृद्ध होऊन पर्यटनालाही केवळ स्वच्छतेमुळेच गती प्राप्त होऊन आपल्याला उत्तम प्रकारे रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने मंगळवारी येथील एकूण ९४ हातरिक्षाच्या श्रमिक चालक -मालकांनी आपले हातावरचे पोट असतानाही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे.डम्ंिपग ग्राउंडच्या जवळचा पाच एकरचा परिसर साफ करण्यासाठी हातरिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, गणपत रांजाणे, संतोष शिंदे, अंबालाल वाघेला आदींसह हातरिक्षा व्यवसाय करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या श्रमिकांपैकी अनेकांनी परिश्रम घेतले.