शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मुरूडमध्ये शहीद दिनी हुतात्म्यांना अभिवादन

By admin | Updated: March 24, 2017 01:16 IST

मुरुड शहरातील समाजसेवक मोहन करंदेकर दरवर्षी २३ मार्च शहीद दिन वेगळ्या प्रकारे साजरा करतात. बुधवारी क्रांतिवीर भगतसिंग यांचा

आगरदांडा : मुरुड शहरातील समाजसेवक मोहन करंदेकर दरवर्षी २३ मार्च शहीद दिन वेगळ्या प्रकारे साजरा करतात. बुधवारी  क्रांतिवीर भगतसिंग यांचा ८६ वा स्मृतिदिन हा शहीद दिन म्हणून साजरा करतो. मुरुडमध्ये आपल्या निवासस्थानी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह मंगल पांडे, मादाम कामा, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, भाई कोतवाल, चाफेकर, लोकमान्य टिळक, मदनलाल धिंग्रा व भारतमातेच्या प्रतिमेचे या दिवशी मनोभावे पूजन करून दिवसभर निर्जळी उपवास करतात.ठाण्याच्या पालिकेतून निवृत्त झालेले करंदेकर गेली कि त्येक वर्षे या दिवशी पहाटेपासून पाण्याचा एक थेंबही प्राशन न करता उपवास करतात. सायंकाळी ७ नंतर नैवेद्य दाखवितात विशेष म्हणजे त्या वेळी एका वाटीत पिण्याचे पाणीही ठेवलेले असते. त्यानंतर ते उपवासाची सांगता करतात. घरी आलेल्यांना या थोर पराक्रमी वीरकथा मुलांना कथा सांगतात. या वेळी त्यांच्या घरी मुरु डच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेवक प्रमोद भायदे, गिरीश साळी, मानसी करंदेकर, दिलीप जोशी, रमेश सावरकर आदींसह शालेय विद्यार्थी व असंख्य मान्यवर भेट देऊन वीर हुतात्म्यांना मानवंदना दिली.नगराध्यक्षा स्नेहा पाटील म्हणाल्या की, मुरु डकर जनतेला मोहन करंदेकर व त्यांच्या कुटुंबाच्या देशभक्तीबद्दलचा अभिमान आहे. त्यांच्यामुळे तरुणांना या थोर वीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अन्य वीर हुतात्म्यांची वीरकथा समजते त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या. (वार्ताहर)