शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक अंतर पाळून साधेपणाने बांधली लग्नगाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:38 IST

आगरी समाजाचे एक पाऊल पुढे

- अनंत पाटील नवी मुंबई : आगरी कोळी समाजातील लग्नसोहळा व हळदीचा कार्यक्रम वाजंत्री, डीजे, नाचगाणी, विद्युत रोशणाई आणि शाकाहारी, मांसाहारी जेवणावळी यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे गांभीर्य ओळखून फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करून गर्दी टाळण्यासाठी वधूवरांकडच्या १० ते १५ जणांच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीने नवी मुंबईतील वाशी गावातील एका मुलाचा विवाह सोहळा साधेपणाने पार पडला.वाशी गावातील अरुण भोईर यांचा मुलगा मनीष आणि पनवेल तालुक्यातील तक्का गावातील गोपीनाथ सोनके यांची कन्या सुहासिनी यांचा विवाह सोहळा गुरुवारी ११ रोजी सायंकाळी वधूच्या (तक्कागाव, पनवेल) येथील घरी पार पडला. हा अत्यंत कमी खर्चात आणि साधेपणाने विवाह करण्याबाबत या मुलाचे मामा आगरी कोळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय रामभाऊ पाटील आणि मुलीचे वडील गोपीनाथ सोनके यांच्यात बैठक झाली. लॉकडाऊनच्या परिस्थितीचे भान ओळखून वधूवरांच्या दोन्ही मंडळींकडून होकार मिळताच गुरुवारी लग्नगाठ बांधली. एरव्ही आगरी कोळी समाजात हळदी आणि विवाह सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी भिंती तांबडणे, हळदी आणि लग्न असे तीन दिवसांचे कार्यक्रम एकाच दिवशी आटोपून घेतले. सामाजिक जबाबदारी व सुरक्षिततेचे सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पाडल्यामुळे कौतुक होत आहे.लग्नासाठी लाखो रुपयांचे कर्ज काढून अनाठायी खर्च करून केवळ पैशाचा चुराडा करणे योग्य नाही. आगरी कोळी समाजाने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून अनाठायी खर्च न करता तोच पैसा त्यांच्या संसारासाठी दिला तर योग्य होईल.- रामभाऊ पाटील, ज्येष्ठ नागरिक, वाशी गाव, नवी मुंबई