शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

कोकणातील आंबा उत्पादकांची कोंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:58 IST

अमूलकुमार जैन ।बोर्ली मांडला : फळे आणि भाजीपाल्यावरील अडत बंद झाली असली, तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा कोणताच फायदा झालेला नाही. आंबा विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने व्यापारी, दलाल आणि अडते यांच्यातील संगनमत शेतकºयाला अपेक्षित भाव मिळण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात विक्रीकेंद्र सुरू करावीत, अशी ...

अमूलकुमार जैन ।बोर्ली मांडला : फळे आणि भाजीपाल्यावरील अडत बंद झाली असली, तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा कोणताच फायदा झालेला नाही. आंबा विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने व्यापारी, दलाल आणि अडते यांच्यातील संगनमत शेतकºयाला अपेक्षित भाव मिळण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात विक्रीकेंद्र सुरू करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.यंदा हवामान बदलाचा मोठा फटका कोकणातील आंबा उत्पादनाला बसला. हवामान बदलामुळे थंडी लांबणे, अवेळी पाऊस, दोन वेळा आलेला मोहर, तुडतुडा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट झाली. दरवर्षीपेक्षा केवळ ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदा आंब्याला सोन्याचा भाव आला आहे. राज्य सरकारने २०१६मध्ये शेतीमालाच्या बाजार स्वातंत्र्यासाठी भाजीपाला व फळे नियमनमुक्ती करण्याचा निर्णय घेतला. दलालांच्या जाचातून शेतकºयांची सुटका होण्यासाठी हा निर्णय जरी चांगला असला, तरी शासनाने एपीएमसीमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे आपला माल विकण्यासाठी शेतकºयांना आजही व्यापारी आणि दलालांकडेच जावे लागत आहे. यात दलाल आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. शेतकºयांचा आंबा खरेदी करून तो दुपटीहून अधिक भावाने इतरत्र विकत आहेत.आंब्यामध्ये कीटकनाशक अंश आढळून आल्यानंतर चार वर्षांपूर्वी आशियाई देशांमध्ये आंब्याची निर्यात थांबण्यात आली होती. वर्षभरानंतर निर्यातबंदी उठवण्यात आली. तेव्हापासून आंब्याची निर्यात चांगल्या प्रकारे होत आहे. पणन विभागाच्या सहकार्याने जल वाहतुकीद्वारेही आंब्याची निर्यात होत आहे. मात्र, यंदा हे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. एपीएमसी (मुंबई), एपीएमसी (गुलटेकडी, पुणे), एपीएमसी (कोल्हापूर), या ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये अजूनही ५५ ते ६० टक्के कोकणातील आंबा जातो. मात्र, येथील दलाल आणि व्यापाºयांनाच हाताशी धरावे लागते. परिणामी, शेतकºयांची कायम फसवणूकच होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली. आंब्यासाठी देशांतर्गत मार्केट उपलब्ध झाल्यास शेतकºयांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षाही मोकल यांनी व्यक्त केली.एक नजर आंबा उत्पादनावरच्कोकणातील आंबा व्यवसायात दरवर्षी सुमारे ११०० कोटींची उलाढाल होते. डझनला जास्तीत जास्त १२०० रु पये, तर किमान २५० ते ३०० रु पये भाव मिळतो.च्आंब्याची पहिली पेटी साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येते. मात्र, तो केमिकल्स मारलेला असतो. आंब्याचा सीझन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतो.

 

संघटनेची प्रमुख मागणीत्या-त्या जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारणेदेशांतर्गत मार्केटला चालना देणेदेशातील पर्यटनस्थळी आंब्याची विक्री करणेदेशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर विक्रीसाठी दालन सुरू करणेदेशांतर्गत मार्केट उपलब्ध झाल्यास चांगला भाव मिळेलमहत्त्वाच्या विमानतळांवर आंब्यासाठी गाळे उपलब्ध करून देणे 

टॅग्स :Raigadरायगड