शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनाअगोदरच मानिवली शाळेच्या इमारतीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:42 IST

३६ लाख रुपये खर्च : बांधलेल्या इमारतीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप; प्रशासनाचे दुर्लक्ष

कांता हाबळे 

नेरळ : कर्जत तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नव्याने बांधण्यात आली आहे. ३६ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटनाअगोदरच या शाळा इमारतीला गळती लागली आहे. या इमारतीच्या काही वर्गखोल्यांमध्ये पाणी पडत आहे. एवढा मोठा निधी मिळूनसुद्धा या दुमजली शाळा इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे.

मानिवली गावात २००५-०६ च्या दरम्यान तीन वर्गखोल्या असलेली षट्कोनी शाळा बांधण्यात आली होती. येथे इयत्ता आठवीपर्यंत शाळा असून येथे वर्गखोल्या कमी पडत असल्याने जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांच्या प्रयत्नाने मानिवली येथे जिल्हा परिषद शाळेच्या पाच वर्गखोल्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात सर्व शिक्षा अभियानांतर्गत अंदाजपत्रकीय रक्कम सुमारे ३६ लाख रुपये मंजूर झाल्यानंतर या इमारत बांधणीचे काम सुरू करण्यात आले होते. ही इमारत घाईघाईत सहा वर्ग खोल्यांची पूर्ण झाली आहे; परंतु पहिल्याच पावसात या इमारतीला गळती लागली आहे.विशेष म्हणजे, अद्याप या शाळा इमारतीचे उद्घाटनही झाले नाही. असे असताना या इमारतीत वर्ग भरवण्यास सुरुवात केली आहे. इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे असून, स्लॅबमधून पाणी वर्गखोल्यांमध्ये पडत असून भिंतीदेखील ओल्या झाल्या आहेत. ही इमारत निकृष्ट दर्जाची झाली असतानादेखील शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेतील शिक्षक, मुख्यापकांनी पंचायत समिती शिक्षण विभाग तसेच जिल्हा परिषदेला कळवले नाही. याबाबत पालक तसेच ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच मानिवली जिल्हा परिषदेच्या षट्कोनी शाळेच्या इमारतीलाही गळती लागली असून त्यावर प्लॅस्टिक टाकले आहे. या शाळेत इयत्ता आठवीपर्यंत १२१ विद्यार्थी आहेत, तर यासाठी तीन इमारती आहेत, नव्याने बांधलेल्या सहा वर्गखोल्या, षट्कोनी इमारतीत तीन वर्गखोल्या तसेच गावात दोन वर्गखोल्या, अशा आठवीपर्यंत एकूण ११ वर्गखोल्या तयार झाल्या आहेत.

शाळेच्या पटांगणाला कंपाउंडही नसल्याचे वाहने शाळेच्या आवारातून ये-जा करत असतात. तसेच स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे. याकडेही दुर्लक्ष झाले असल्याचे समोर आहे. तसेच या ३६ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत मुख्याध्यापक, तसेच शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाला का कळविले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. मानिवली शाळेला निधी मिळूनही हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पालक आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे यांच्याशी मानिवली जिल्हा परिषदेच्या शाळा इमारती संदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.मानिवली जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीत पाच वर्गखोल्या मंजूर होत्या; परंतु सहा वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. शाळेच्या छताला गळती लागली आहे. या संदर्भात तक्रारी कोणाकडेही केल्या नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीला कळविले आहे. त्यांनी शाळेच्यावर सभागृह बांधायचे ठेवले आहे. त्यासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत.- पी. टी. राठोड, मुख्याध्यापक,मानिवली शाळामानिवली जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या संदर्भात आमच्याकडे कोणत्याही प्रकारे तक्रारी आलेल्या नाहीत.- बालाजी पुरी, गटविकास अधिकारी,पं. स. कर्जत

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगड