शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्षपदी महेश मोहितेंची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:08 IST

अलिबाग येथे भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

अलिबाग : भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी अ‍ॅड. महेश मोहिते यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विनय नातू यांनी केली.

अलिबाग येथे भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी दक्षिण रायगडमधून अलिबाग, मुरुड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचा एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनय नातू यांच्याकडे दाखल झाला, त्यामुळे अ‍ॅड. महेश मोहिते यांची दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

२०१५ मध्ये याच सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणांचा अवलंब करण्यासाठी जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली. युवा मोर्चाच्या बांधणीनंतर पक्षाने अलिबाग, मुरु ड विधानसभा अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. या कालावधीत दोन्ही तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसमवेत भारतीय जनता पार्टीची ताकद वाढविली. आता सत्ता आपल्याकडे नाही; परंतु संघर्ष करून विकासकामांचा झंझावात रायगड जिल्ह्यात आणण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे, असे अ‍ॅड. मोहिते यांनी सांगितले. पक्षाने आता माझ्यावर चार विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी म्हणून दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केली आहे. ही निवड सार्थ ठरविण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे सांगितले.

२०१९ मधील विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष युतीमध्ये लढली. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात युतीचे आमदार निवडून आले आहेत. यामध्ये तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. भविष्यातील राजकीय वेध घेता येणाºया सर्वच निवडणुका भारतीय जनता पक्ष ‘एकला चलो’च्या भूमिकेत आणि सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या विरोधात लढायच्या आहेत. यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या शिलेदारांनी संघर्ष आणि अधिक सक्षमतेने पक्षाची बाजू तळागाळात पोहोचविण्यासाठी सज्ज राहायला हवे, असे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. या वेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विनय नातू, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, अविनाश कोळी, बिपीन म्हामुणकर, प्रकाश धुमाळ, संजय कोनकर, अमित घाग, सतीश लेले, हेमंत दांडेकर, मिलिंद पाटील, परशुराम म्हात्रे, अ‍ॅड. परेश देशमुख, उदय काठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.