शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

उनपमध्ये महाआघाडीला धक्का

By admin | Updated: November 13, 2016 04:53 IST

उरण शहर परिवर्तन महाआघाडीतील प्रभाग ‘२ ब’चे राष्ट्रवादीचे उमेदवार उनपचे माजी उपनगराध्यक्ष आणि माजी विरोधीपक्षनेते चिंतामण घरत यांनी तडकाफडकी उमेदवारी

उरण : उरण शहर परिवर्तन महाआघाडीतील प्रभाग ‘२ ब’चे राष्ट्रवादीचे उमेदवार उनपचे माजी उपनगराध्यक्ष आणि माजी विरोधीपक्षनेते चिंतामण घरत यांनी तडकाफडकी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या निवडणुकीतील अचानकपणे घेतलेल्या माघारीमुळे निवडणुकीआधीच महाआघाडीला धक्का बसला आहे. आरोग्याच्या तक्रारीमुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे चिंतामण घरत सांगत असले तरीही विविध राजकीय गोटात अनेक तर्क व्यक्त होऊ लागले आहेत. उरण शहर परिवर्तन महाआघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, मनसे असे राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. एकत्रित येऊन मागील १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सेना-भाजपाचा पराभव करण्यासाठीच माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची निर्मिती करण्यात आली आहे. उनपच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीने चर्चेअंती पक्षनिहाय जागांचे वाटपही केले आहे. जागावाटपात चिंतामण घरत यांना महाआघाडीने प्रभाग २चे अधिकृत उमेदवार घोषित केले आहे. पाच वेळा नगरसेवकपदी निवडून आलेल्या चिंतामण घरत यांनी निवडून आल्यानंतर शहराच्या विकासासाठी कोणकोणती कामे करणार याचा लेखाजोखाही जाहीरपणे वृत्तपत्रांतून जाहीर केला होता. अशी सर्व अंगानी तयारी असताना चिंतामण घरत यांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीच्या एक दिवस अगोदरच तडकाफडकी मागे घेतल्याने महाआघाडीबरोबरच विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतली असल्याची माहिती चिंतामण घरत यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिली. तर कौटुंबिक समस्येमुळे घरत यांनी माघार घेतली असल्याची प्रतिक्रिया महाआघाडीचे मार्गदर्शक माजी आमदार विवेक पाटील यांनी दिली.मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांकडून महाआघाडीतील काही नेत्यांकडूनच चिंतामण घरत यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानेच संतप्त झालेल्या घरत यांनी तडकाफडकी माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. तर राजकीय गोटात वेगळीच कारणे चर्चेत आहेत. चिंतामण घरत यांच्या माघारीमुळे विरोधकांना चांगलाच फायदा होणार आहे. कारण आता प्रभाग ‘२ ब’मध्ये दोनच उमदेवार उरल्याने सेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये सरळ लढाई होणार आहे. (वार्ताहर)