शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील महावितरण कर्मचारी संपावर; अलिबाग येथे कर्मचाऱ्यांची निदर्शने

By राजेश भोस्तेकर | Updated: January 4, 2023 12:14 IST

विजेची समस्या निर्माण झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार असल्याचे संपकऱ्याचे म्हणणे आहे.

अलिबाग : शासनाने नफ्यात सुरू असलेल्या शासकीय कंपन्या उद्योजकाच्या हातात देण्याचा घाट सुरू केला आहे. नफ्यात असलेली महावितरण कंपनी ही अदाणी उद्योगाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना याचा फटका बसणार असून कर्मचाऱ्यांचेही नुकसान होणार आहे. आम्ही आमच्या आर्थिक कारणासाठी संप न करता अदाणी कंपनीला समांतर परवानगी देऊ नये यासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास देण्याचा आमचा कोणताच हेतू नाही आहे. विजेची समस्या निर्माण झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार असल्याचे संपकऱ्याचे म्हणणे आहे.

रायगड जिल्ह्यातील महावितरणचे पंधराशे कर्मचारी, अधिकारी, अभियंते बुधवार पासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. अलिबाग चेंढरे महावितरण कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून सरकार व अदाणी विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी, अधिकारी, अभियंते, महिला कर्मचारी या निदर्शनात सहभागी झाले होते. 

रायगड जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यातील काही भाग हा अदाणी समूहाकडे दिला जाणार आहे. महावितरणच्या या खाजगीकरणला सर्वं महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. वेळोवेळी आपला विरोध कर्मचाऱ्यांनी विविध मार्गाने शासनाकडे नोंदविला आहे. मात्र शासन याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे अखेर संपाचे अस्त्र उगारले आहे. ४ ते ६ जानेवारी असे ७२ तास संप सुरू राहणार आहे. त्यामुळे या काळात वीज गेल्यास ग्राहकांची अडचण होणार आहे. राज्यातील अनेक संच बंद झाले असून विजेचा तुटवडा जाणवणार असल्याचे संपकरी यांनी म्हटले आहे. 

रायगड जिल्ह्यातील कृती समितीच्या माध्यमातून कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. ग्राहकांना त्रास देण्याचा आमचा कोणताच हेतू नाही आहे. खाजगीकरणामुळे ग्राहकांनाही वाढीव बिले येणार आहेत. तसेच शासनाच्या विजे बाबत असलेल्या योजना बंद होणार आहेत. त्यामुळे आमच्या संपात ग्राहकांनीही आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन कर्मचाऱ्यांनी केले आहे. 

मेस्मा लावला तरी मागे हटणार नाहीशासनाने कर्मचाऱ्यांनी संप करू नये यासाठी मेस्मा लावण्याची नोटीस पाठवली आहे. मात्र या कारवाईला आम्ही घाबरत नाही आम्ही मागे हटणार नाही असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. 

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपमहावितरण कर्मचारी यांचा खाजगी करणला विरोध आहे. याबाबत कर्मचारी हे ७२ तासाच्या संपावर गेले आहेत. याबाबत शासनाने काही तोडगा काढला नाही तर १८ जानेवारी पासून बेमुदत संप पुकारला जाणार असून पुढे होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल असा इशारा कृती समितीचे सुरेश गोसावी यांनी दिला आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग