शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमला रोहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 01:22 IST

रोह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

रोहा : रोह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासून गणवेशातील विद्यार्थ्यांसह एन.सी.सी. व आर.एस. पी.च्या कँडेट्सनी ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत संचलन केले. शहरात ठिकठिकाणी देशभक्तीपर गीत लावून अतिशय उत्साहाने हा दिवस साजरा करण्यात आला.रोहा नगरपालिकेच्या डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहाच्या प्रांगणात नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर बाजीप्रभू देशपांडे क्रीडांगण हनुमान टेकडी येथे नगरपालिकेतर्फे उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्र म रोहा तहसील कार्यालय येथे संपन्न झाला. या वेळी प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पोलीस निरीक्षक रामुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी संचलन व मानवंदना दिली. याप्रसंगी तहसीलदार सुरेश काशिद, नायब तहसीलदार दीपक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर, शिंदे सर लालताप्रसाद कुशवाह, संजय कोणकर, जितेंद्र जोशी आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थितहोते.सोमवार, १४ आॅगस्टच्या रात्री तरुण कार्यकर्ते नीलेश शिर्के, राजेश काफरे, हर्षद साळवी आदी तरुण मंडळींनी शहरात मशाल फेरी काढून स्वातंत्र्य दिनाचे स्वागत केले.रोह्यात विविध ठिकाणी ध्वजारोहणरोहा : रोहा न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश सुभाष फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र दिनाचा ७०वा वर्धापन दिन साजरा केला. या वेळी मान्यवर, वकील आणि कर्मचारी उपस्थित होते. रोहा पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर या वेळी सहायक पोलीस निरीक्षक , पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.धाटाव येथील परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हायस्कूलमध्ये माजी सरपंच विजयराव मोरे तर यशवंत धाटाव ग्रामपंचायत धाटाव कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच विनोद पाशीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ग्रा. पं.चे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी व तरु ण, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंजुमन इस्लाम हायस्कूलच्या प्रांगणात अध्यक्ष उस्मान रोहेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रोहा पंचायत समितीच्या आवारात गटविकास अधिकारी यांनी ध्वजारोहण केले.