शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेएसडब्ल्यू कंपनीतून धुरांचे लोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 23:56 IST

वासाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : काही काळ काळोख झाल्याने धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या चिमणीमधून धूळमिश्रित धुरांचे लोळ बाहेर पडले. लाल रंगाच्या या धुराचा वास अतिशय असह्य करणारा होता. त्यामुळे पेणसह अलिबाग तालुक्याच्या काही परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच जेएसडब्ल्यू स्टील कंपनीबाबत उलट-सुलट चर्चेचे रान उठले आहे. त्यातच कंपनीच्या चिमणीमधून अचानक लाल रंगाच्या धुराचे लोळ उठल्याने परिसरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले. ही घटना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे पेण आणि अलिबाग तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असल्याने रस्त्यावर, तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी होती. त्याचप्रमाणे, कंपनी परिसराच्या बाजूला मोठ्या संख्येने नागरी वस्तीही आहे. कंपनीच्या चिमणीमधून अचानक धुळीचे लोळ पसरल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले. या धूळमिश्रित धुरामुळे डोळे चुरचुरत असल्याने कंपनीमधून विषारी वायू पसरला तर नाही ना, अशी शंका नागरिकांमध्ये होती. सुमारे २० मिनिटे चिमणीतून धुरांचे लोळ आकाशाकडे झेपावत होते. त्यामुळे परिसरामध्ये कोळोख पसरला होता. आपल्या आजूबाजूला कोण आहे की नाही, हेही कळत नव्हते. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते.दाट पसरलेल्या धुरामुळे समोरचे दिसेनासे झाले होते. लालसर रंगाचा प्रचंड धूर आणि त्याच्या उग्र वासामुळे डोलवी, गडब, काराव, वडखळ, आमटेम, नवेगाव, वाशीसह परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांना असह्य झाले होते. मात्र, नेमके काय झाले? याबाबत काहीही माहिती नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचे घबराटीचे वातावरण होते. दरम्यान, जेएसडब्ल्यू कंपनीतीलप्लान्ट शटडाऊन झाल्याने धुळीचे लोळ उठले होते. हा विषारी वायू नसल्याचे पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी स्पष्ट करून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.कंपनीमध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. सकाळी साडेअकराच्या सुमारास कंपनीच्या कोक ओव्हन प्लान्टमध्ये इलेक्ट्रिक पॉवर ट्रिप झाली. त्यामुळे कोक बनवण्याची प्रक्रिया बंद पडली आणि शटडाऊन होऊन मोठ्या प्रमाणात चिमणीमधून धुळीचे लोळ बाहेर पडले. वातावरणात पसरलेला हा धूर विषारी नाही. प्लान्ट पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.- नारायण बोलबुंडा,जनसंपर्क अधिकारी, जेएसडब्ल्यू