शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ला बंद होणार असल्याने स्थानिक नाराज, लाखो रुपयांच्या उलाढालीला लागणार ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:18 IST

Janjira fort : मुरुड समुद्रकिनारी व राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याकरिता आल्याने येथील व्यावसायिकांना चांगला रोजगार मिळत असतो.

आगरदांडा : मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रात असणारा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी नाताळाच्या दिवशी व नववर्षाचे स्वागत करण्याकरिता लाखो पर्यटक महाराष्ट्राच्या विविध भागांतून येत असतात. मुरुड समुद्रकिनारी व राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याकरिता आल्याने येथील व्यावसायिकांना चांगला रोजगार मिळत असतो. या रोजगारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. परंतु कोरोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याने त्यात ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंद होत असल्याने स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.नाताळ सण आणि नववर्ष स्वागताचा संभाव्य जल्लोष लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक परिस्थितीनुसार रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निथी चौधरी यांनी घेतला आहे. तसेच कोरोनासंबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर कारवाई करण्यात येणार असल्याने व्यावसायिक धास्तावले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड