शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वाचले विद्यार्थ्यांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:50 IST

जमिनीला तडे गेल्याने घरांचे नुकसान; महाडमधील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जमीनदोस्त

बिरवाडी : रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशामुळे रायगड जिल्हा परिषदेमधील विद्यार्थ्यांचे प्राण वाचल्याचीघटना समोर आली आहे. महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत बुधवार ७ आॅगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे जमीनदोस्त झाली.महाड तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्याने शाळा बंद ठेवण्याचा आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्याने या शाळेत शिकत असणाºया इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. महाड तालुक्यातील कसबेशिवथर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली. याप्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता रा.जि.प. सदस्य मनोज काळिजकर यांच्याजवळ संपर्क साधला असता अतिवृष्टीच्या काळामध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यानेच विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत असे सांगितले तर या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्या वर्षी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे सादर केला असल्याचे स्पष्ट केले आहे.एमआयडीसीतील कं पन्यांचे नुकसानएमआयडीसीमधील कारखान्यांमधून महापुराचे पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामध्ये महाड एमआयडीसीमधील हितकरी हायटेक प्रायव्हेट लिमिटेड, लक्ष्मी आॅरगॅनिक, हायकल लिमिटेड, मलक स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यांचा समावेश आहे. महसूल विभागाचे तलाठी यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.माझेरी गावातील दोन घरांचे नुकसानमहाड तालुक्यात सतत पडणाºया मुसळधार पावसामुळे मंगळवारी माझेरी गावामध्ये जमिनीला भेगा पडल्याने या ठिकाणी घराच्या बांधकामाला तडे गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये शांताराम कोळसकर, दीपक महामुनी यांच्या घराचे नुकसान झाले आहे. या परिसरातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .