नागोठणे : भारतीय लगोरी महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र लगोरी संघटना आणि अहमदनगर जिल्हा लगोरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ५ वी सब ज्युनिअर आणि ३ री मिनी गट राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा साई संस्थानचे विश्वस्त आ. हितेंद्र ठाकूर यांच्या सहकार्यातून शिर्र्डी येथील साई पालखी निवाराच्या मैदानात नुकतीच पार पडली. या राष्ट्रीय स्पर्धेत २४ राज्यांतील संघांचे १२०० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत दोन्ही गटात महाराष्ट्राच्या मुलींनी अजिंक्यपद मिळविले, तर मुलांच्या संघांना दोन्ही गटात उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ मलेशिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या राष्ट्रीय लगोरी स्पर्धेमध्ये मिनी गटात मुलींच्या महाराष्ट्र संघाने पॉण्डेचेरीचा, सब ज्युनिअर गटात हरियाणाचा पराभव करून विजेतेपद मिळविले.मिनी गटात अंतिम सामन्यात महाराष्ट्राला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. (वार्ताहर)
लगोरीत महाराष्ट्राच्या मुलींना यश
By admin | Updated: October 15, 2016 06:49 IST