शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वादळातील नुकसानग्रस्त शाळांसाठी अल्प निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:43 IST

म्हसळ्यातील शाळांची अवस्था अत्यंत बिकट

म्हसळा : चक्रीवादळाने म्हसळा तालुक्याची अवस्था अत्यंत बिकट असून सर्वच शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. फार मोठ्या प्रमाणात शाळांची पडझड झाली असून जिल्हा परिषदेकडून फक्त दुरुस्तीच्या मंजुरीच्या याद्याच प्रसिद्ध झाल्याचे चर्चेत आहे.अगदी प्रत्येक गावात असणाऱ्या शाळांचे छत तर काही शाळांच्या इमारतीच्या भिंती पडल्या होत्या. या चक्रीवादळामध्ये तालुक्यात प्राथमिक शाळांसाठी अंदाजे एक ते दीड कोटीचा निधी तात्पुरत्या दुरुस्तीसाठी अत्यावश्यक असून, अजून निधीचा काही ठिकाणा नसल्याचे बोलले जाते. सध्याच्या परिस्थितीत तालुक्याचे ४० शाळांसाठी २ लाख रुपयांप्रमाणे ८० लाख मंजूर झालेले असले तरीदेखील ते नुकसान झालेल्या परिस्थितीला न पुरणारा निधी असून जखमेवरती मलम लावल्यासारखे आहे. तसेच १९ शाळांसाठी सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत प्रास्ताविक निधी मंजूर केला आहे. परंतु ज्या १९ शाळा सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत प्रस्तावित आहेत त्याही शाळा चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांनादेखील शासनाने २ लाख घोषित केलेला निधी अपेक्षित आहे. असे असताना तालुक्यासाठी निधी कमी करून का दिला, हा प्रश्न निरुत्तरच आहे.शासनाने पारित केल्याप्रमाणे चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या शाळेचा निधी त्यांना उपलब्ध करून द्यावा तरच मोडकळीस झालेल्या शाळा नव्याने उभ्या राहतील. तालुक्यात एकूण १०२ शाळा मोडकळीस आल्या आहेत. त्यापैकी आताच्या यादीनुसार एकूण ५९ शाळांना निधी मंजूर झाला. परंतु उर्वरित राहिलेल्या ४३ शाळांचा निधी कधी मिळणार, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला आहे. काही दिवसांतच शाळा सुरू होण्याचे चिन्ह आहे. परंतु शाळाच जर जमीनदोस्त असतील तर विद्यार्थी बसणार कोठेॽ त्याकरिता शाळा दुरुस्तीसाठी लागणारा अंदाजे ३ कोटींचा निधी मिळणे गरजेचे आहे. शाळा पूर्ववत आणि सुस्थितीत व्हाव्यात  अशी मागणी होत आहे.