शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

उत्सवकाळामध्ये विजेचा लपंडाव सुरू

By admin | Updated: September 19, 2015 00:10 IST

गणेशोत्सव साजरा करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, याकरिता महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी महाड तालुक्यामध्ये बैठकांचा सपाटा लावला होता. मात्र प्रत्यक्ष गणेशोत्सव

बिरवाडी : गणेशोत्सव साजरा करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, याकरिता महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी महाड तालुक्यामध्ये बैठकांचा सपाटा लावला होता. मात्र प्रत्यक्ष गणेशोत्सव काळामध्ये महाड शहर व तालुक्यातील बिरवाडी, खरवली परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गणेशभक्तांमध्ये प्रचंड नाराजी व संतापाची भावना निर्माण झाली आहे. गणेशाचे आगमन झाल्यानंतर तब्बल ४८ तासामध्ये आठ वेळा विद्युतपुवठा खंडित झाला होता, त्यामुळे गणेशभक्तांची प्रचंड गैरसोय होत होती. महाड शहरामधील तसेच तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केलेले देखावे पाहण्यासाठी व गणेशदर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने बाजरपेठेत गर्दी केली होती. त्यावेळेला विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने भाविकांचा हिरमोड झाला. रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी नगरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी संबंधित खात्याने घेतलीच पाहिजे, अशा सूचना केल्या होत्या. तर रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी गणेशोत्सव काळामध्ये रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित होणार नाही, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र ऐन गणेशोत्सव काळात लोकांना अंधारातच संध्याकाळची आरती करावी लागली. विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने खरवली गावामध्ये नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती येथील नागरिक मोहन जाधव यांनी दिली आहे.