शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण सबस्टेशनमुळे जीवास धोका

By admin | Updated: October 7, 2015 00:04 IST

कोटनाका येथील वीज वितरण कंपनीकडून उभारण्यात आलेल्या २२/२२ के व्ही सबस्टेशनची दुरवस्था झाली आहे. सबस्टेशनमधील काही उपकरणे जीर्ण झाली असून

उरण : कोटनाका येथील वीज वितरण कंपनीकडून उभारण्यात आलेल्या २२/२२ के व्ही सबस्टेशनची दुरवस्था झाली आहे. सबस्टेशनमधील काही उपकरणे जीर्ण झाली असून, मोडकळीस आली आहेत. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या, नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. कोटनाका सबस्टेशनमधील काही उपकरणे अ‍ॅल्युमिनियमच्या तारेने बांधलेली आहेत. येथील लोखंडी चॅनेल गंजलेल्या अवस्थेत लोंबकळत आहेत. जमिनीपासून केवळ ९ ते १० फुटापर्यंत उंची असलेल्या या सबस्टेशनवर चिरनेर फिडर, द्रोणागिरी फिडर व इंडस्ट्रीयल फिडर अवलंबून असून, जीर्णावस्थेमुळे कधीही वीजपुरवठा बंद होऊ शकतो. सबस्टेशन अतिशय जीर्ण व धोक्याचे झाले असून, त्याच्या बाजूला तीन-साडेतीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून नवीन सबस्टेशन उभारण्यात आले आहे. मात्र ते अद्याप सुरू न झाल्याने येथील उपकरणे धूळखात पडली आहे. दुर्घटना घडल्यावरच वीज वितरणला जाग येईल का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.केबल टाकण्याचे काम सुरू आहे. याशिवाय कंट्रोलिंग व टेस्टिंगचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. महिनाभरात नवीन सबस्टेशनवरील जोडणीची कामे पूर्ण होतील. त्यानंतर हे सबस्टेशन सुरू करण्यात येईल. वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर जुने सबस्टेशन बंद करण्यात येईल. - प्रवीण साळी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, वीज वितरण उरण