शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धनाजी किसन काळे याला जन्मठेप

By admin | Updated: July 2, 2017 06:13 IST

उरण तालुक्यातील बोकडविरा येथील एम. एस. ई. बी. झोपडपट्टीमध्ये राहाणारे अमोल गिरीजाप्पा भालेराव यांच्या खून प्रकरणी, त्याच्याच

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : उरण तालुक्यातील बोकडविरा येथील एम. एस. ई. बी. झोपडपट्टीमध्ये राहाणारे अमोल गिरीजाप्पा भालेराव यांच्या खून प्रकरणी, त्याच्याच शेजारी राहणारा धनाजी किसन काळे याला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.६ मार्च २०१५ रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान गिरीजाप्पा भालेराव यांच्या घराशेजारी राहणारे आरोपी धनाजी काळे व किसन काळे हे त्यांच्या घरी जोरजोरात गाणी बोलत होते. अमोल भालेराव याने त्यांच्या घरी जाऊन त्यांना, गाणी हळू बोला, मला कामावर लवकर जायचे आहे, असे म्हटल्याने आरोपी धनाजी काळे व किसन काळे यांनी अमोल भालेराव याला शिवीगाळ करून हाताबुक्क्याने मारहाण करून आरोपी धनाजी किसन काळे याने त्याच्या घरातील चाकू आणून यातील अमोल भालेराव याच्या पोटावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास प्रथम उपचाराकरिता उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे नेले व तेथून मुंबईत सायन हॉस्पिटल येथे पाठविले. तेथे उपचारादरम्यान अमोल भालेराव यांचा मृत्यू झाला. परिणामी, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खटल्याची सुनावणी रायगड जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु. गों. सेवलीकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. अमित देशमुख यांनी सात साक्षीदारांची साक्ष नोंदविली. मृत अमोल भालेराव यांची बहीण प्रियांका भालेराव व वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश चंद्रकांत डेरे व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. अमित देशमुख यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद व दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी धनाजी किसन काळे (२२ वर्षे) याला भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये दाखल गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर त्याचा भाऊ किसन काळे यास भा.द.वि.कलम ३२३अन्वये दोषी ठरविले. त्याने भोगलेला कारावास पुरेसा असल्याने त्याची मुक्तता केली आहे.