शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

छोट्याशा संदूकमध्ये पुस्तकांचे वाचनालय! जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचा-याची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:37 IST

डिजिटलच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती रोडावत असताना ती टिकवण्यासाठी एका अवलियाने चक्क छोट्याशा संदूकमध्येच पुस्तकांचे वाचनालय सुरू केले आहे. सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आधी मोबाइल हातात घ्यायचे, मात्र हे वाचनालय सुरू झाल्यापासून त्यांनाही या संदूकरूपी वाचनालयाची गोडी लागली आहे. हा अवलिया दुसरा, तिसरा कोणी नसून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील एक कर्मचारी आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : डिजिटलच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती रोडावत असताना ती टिकवण्यासाठी एका अवलियाने चक्क छोट्याशा संदूकमध्येच पुस्तकांचे वाचनालय सुरू केले आहे. सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आधी मोबाइल हातात घ्यायचे, मात्र हे वाचनालय सुरू झाल्यापासून त्यांनाही या संदूकरूपी वाचनालयाची गोडी लागली आहे. हा अवलिया दुसरा, तिसरा कोणी नसून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील एक कर्मचारी आहे.हेमंत पाटील हे सध्या शिपाई या पदावर कार्यरत आहेत. वाचनाबरोबरच त्यांना लिखाणाचीही आवड आहे. अध्यात्माकडे कल असणारे पाटील मात्र सर्वधर्मसमभाव हा मंत्र जपतात. पाटील यांच्या लिखाणाचा आवडता विषय हा प्रवास वर्णन करणे आहे. त्यांनी ज्याज्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत त्यांचा प्रवासाचा विचार सुरू व्हायचा तेथूनच त्यांचे शब्द कोºया कागदावर आकार घेत होते. अलिबागमध्ये सध्या ते स्थायिक आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून पाटील यांनी हा पल्ला गाठला आहे. त्यांना त्यांच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी तेवढीच मोलाची साथ दिली आहे.पाटील कार्यालयामध्ये जेवणाच्या सुट्टीमध्ये पुस्तक वाचत होते. त्यावेळी त्यांच्याच कार्यालयातील एका कर्मचाºयाने त्यांना विचारले, अरे कोणते पुस्तक वाचतोस, मलाही दे वाचायला. त्यावेळी पाटील यांनी एका अटीवर पुस्तक देण्याचे मान्य केले. ती अट होती पुस्तकाच्या बदल्यात दुसरे पुस्तक वाचायला घ्यायचे. समोरच्या कर्मचाºयाने तत्काळ होकार देत पाटील यांच्याकडील पुस्तक घेत त्याबदल्यात दुसºया दिवशी त्यांना दुसरे पुस्तक दिले. पाटील यांनी मग ठरवले सर्वजण मधल्या वेळेमध्ये मोबाइलवर वेळ घालवतात, तर काही गप्पा मारण्यात. त्यावेळी त्यांनी आपल्याकडील पुस्तक वाचनाची गोडी कर्मचारी, अधिकारी यांना लागावी यासाठी सर्व पुस्तके कार्यालयात आणली. त्या सोबतच एक लाकडी संदूकही आणला. जिल्हाधिकाºयांचे स्वीय सहायक केदार शिंदे आणि जगन वरसोलकर, शिपाई संदीप भोईर यांच्या सहकार्यातून ‘पंचामृत वाचनपुष्प’ असे संदुकीतील वाचनालयाचे नामकरण केले.१३ आॅक्टोबर २०१५ पासून त्यांनी या संदूक वाचनालयाची सुरुवात केली. कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी या संदूकमधून एक-एक पुस्तक वाचायला नेऊ लागले. कोणत्या वाचकाने कोणते पुस्तक नेले, कधी नेले, कधी परत केले यासाठी एक रजिस्टरही ठेवेल आहे. त्यामध्ये या सर्व नोंदी केल्याचे दिसून आले. पुस्तक वाचणाºया वाचकाकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. वाचन संस्कृती टिकली पाहिजे, वाचनाची आवड जपली पाहिजे, असे हेमंत पाटीलयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खरे तर आजची तरुण पिढी ही मोबाइल, संगणक यांच्या आहारी गेली आहे. त्यामुळे त्यांचे अभ्यासाव्यतिरिक्त असणारे अवांतर वाचन होत नाही. त्यांच्यापर्यंत पुस्तके पोचली पाहिजेत, अशी इच्छा पाटील यांनी बोलून दाखवली.संदूकरूपी खजिन्यातशेकडो पुस्तके१ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक, कथा, कादंबºया, कविता त्याचप्रमाणे बुद्धांच्या विचारांची अशी शेकडो पुस्तके पाटील यांच्या संदूकरूपी खजिन्यात आहेत. जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना काही दिवसांपूर्वी याबाबतची कुणकुण लागली.२त्यांनी पाटील यांना बोलावून घेतले आणि कोणती-कोणती किती पुस्तके आहेत, असे विचारले. त्यावेळी पाटील यांनी आपले संदूकरूपी वाचनालयच सूर्यवंशी यांच्या पुढ्यात ठेवले. त्यावेळी ते थक्कच झाले. आपल्या कर्मचाºयाची ही आवड पाहून तेही खूश झाले. कोणकोण पुस्तके वाचतात, असे सूर्यवंशी यांनी विचारताच, आपल्याच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी वाचतात, असे पाटील यांनी सांगताच सूर्यवंशी खूश झाले.३कर्मचारी, अधिकारी यांना वाचनाची सवय लागत असल्याचे पाहून त्यांनी पाटील यांचे कौतुक करून पाठ थोपटली. त्याचवेळी स्वीय सहायक केदार शिंदे यांनी पाटील यांच्या लिखाणच्याबाबतीमध्येही सूर्यवंशी यांना सांगितले. त्यांनी पाटील यांनी लिहिलेले प्रवास वर्णन वाचले. त्यांना ते आवडल्याचे पाटील यांनी सांगितले.४पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत सकारात्मक निर्णय घेतो, असेही त्यांनी सांगितले. पाटील यांच्यासारखे अवलिया प्रत्येक कार्यालयात निर्माण झाले, तर वाचनावर आलेले संकट कोसो दूर जाईल यात शंकाच नाही.

टॅग्स :Raigadरायगड